(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माणस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत महा-आवास अभियान (२०२१-२२ )घरकुल पुरस्कार वितरण सोहळाआज दिनांक :१७/ १०/२०२२ ला सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती सिंदेवाही सभागृहामध्ये मा. आ. विजयभाऊ वडेट्टीवार, बम्हपुरी विधानसभा क्षेत्र व मा. अक्षय सुकरे गट विकास अधिकारी पं.स. सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कुष्ठ घरकुले म्हणून मोहाळी नलेश्वर येथील शामराव ढोक, खातगाव जनार्दन सिडाम, पेटगाव मोतीसिन, कळमगाव गन्ना प्रतिभा निमगडे , मेंढा माल श्रावण खोब्रागडे, विरवा गंगुबाई कोडापे यांना सर्वोउत्कृष्ट घरकुले म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.Best Gharkul Award Distribution Ceremony Program at Sindewahi Hall of Panchayat Samiti
व महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तांबेगडी मेंढा ,खातगाव, भेंडाळा, कळमगाव गन्ना, नाचण भट्टी व पळसगाव जाट येथील सचिवांना पुरस्कार वितरण सोहळा करण्यात आले तसेच महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वोउत्कृष्ट क्लस्टर प्रभाग म्हणून मनोज देशमुख व स्वप्नील कायरकर यांना प्रथम क्रमांक पुरस्काराचे ट्राफि तसेच प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही चे सुकरे, विस्तार अधिकारी बुरांडे, विस्तार अधिकारी पंचायत चे अमित महाजनवार ,घरकुल विभाग पंचायत समितीचे गोपाले व तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव सरपंच तसेच ग्रामस्थ यावेळेस हे उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment