दुर्गापूर /चंद्रपुर : दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी कु. कवीता मोतीराम चाफले वय 38 रा. कोंढी वार्ड क्रमांक 5 उर्जानगर जि.चंद्रपुर यांनी पो.स्टे. दुर्गापूर येथे तोंडी रिपोर्ट दिली की दि.१६/१०/२२ रोजी धम्मचक्र परीतर्वन दिनाच्या दिक्षा भुमी चंद्रपूर येथे दर्शन घेण्याकरीता आपले परीवारासह गेली असता सायंकाळी ते दिनांक १७/१०/२०२२ चे रात्रौ ०१:०० वा च्या घरी परत आली असता दरम्यान अज्ञात चोरांनी फिर्यादीचे घराचे ताला तोडुन घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागीने व नगदी १६,०००/-रू असा एकुण ५,०५,४००/-रूचा मुद्देमाल चोरून नेला अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पो.स्टे. ला अप क. १७७/२०२२ कलम ४५४, ४५७,३८० भा.द.वी. चा गुन्हा नोंद करण्यात आला.
Durgapur police arrested the accused who committed burglary within 24 hours
सदर गुन्हया बाबत मा. पोलीस अधिक्षक ,अरविंद साळवे साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी , सुधिर नंदनवार साहेब चंद्रपुर, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे पो.स्टे. दुर्गापूर यांनी विशेष पथक पोहवा सुनिल गौरकार, पोहवा अशोक मंजुळकर पो. अं.मंगेश शेंन्डे, मनोहर जाधव, किशोर वलके पो.स्टे. दुर्गापूर यांनी नेमण्यात आले सदर पथकांनी आरोपी नामे आयुष राजेंद्र चव्हाण वय 19 वर्ष रा. वार्ड क्रमांक 03 दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर 2 विधी संघर्ष बालक यास २४ तासात आत ताब्यात घेउन आरोपी व वि.सं. बालकाकडुन सोन्या चांदीचे दागीने व नगदी १६,०००/-रू असा एकुण ५,०५,४००/-रू चा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा काही तासातच उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
0 comments:
Post a Comment