चंद्रपूर : आदिवासी, दुर्गम आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आमदार सुभाष धोटे यांनी खरा लोकनेता असल्याचे सिद्ध केले आहे असे प्रतिपादन चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले
राजुरा विधानसभेचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात खासदार बोलत होते. यावेळी सार्वजनिक शारदा, दुर्गा देवींच्या मंडपात सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यासोबत आमदार सुभाष धोटे यांच्या कार्याविषयी चित्रफीत देखील यावेळी दाखविण्यात आली.
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जिवती तालुका असून येथे आदिवासी कोलाम बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. विकासापासून कोसोदूर असलेल्या जिवती क्षेत्रामध्ये आणि गोंडपिपरी भागामध्ये आमदार धोटे यांच्या पुढाकाराने विकासाची कामे झाली आहेत.
याप्रसंगी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगराध्यक्ष राजुरा अरुण धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर अरुण निमजे, तालुका काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्ष गडचांदूर सरिता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, पापय्या पोनमवार, हंसराज चौधरी, सुग्रीव गोतावडे, उत्तमराव पेचे, विजय बावणे, रदीफ खान, सचिन भोयर, विक्रम येणें, सतीश बेत्तावार यांची उपस्थिती होती.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या कि, मी आमदार म्हणून मुंबई येथे विधानभवनात काम करीत असतांना त्यांचे मार्गदर्शन नेहमीच लाभत असते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या लाभ मला माझा मतदार संघाचा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याकरिता वेळोवेळी झाला आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

0 comments:
Post a Comment