Ads

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज-डी के आरिकार

चंद्रपूर :कोरोना काळात ऑक्सिजन अभावी कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तेव्हा अनेकांना झाडांचे महत्त्व समजलं कारण वड पिंपळ कडुलिंब हे वृक्ष 20 ते 24 तास ऑक्सिजन देतात आणि माणूस ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे वादळ वारा पाऊस पूर येतात व जीवित व वित्तहानी होत असतात.
आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे आले पाहिजे. असे विचार चंद्रपूरचे पर्यावरण प्रेमी दलित मित्र व आदिवासी सेवक डी के आरीकर यांनी व्यक्त केले.
ते पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूरच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रजातीच्या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आश्रय कॉलनी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डी के आरेकर बोलत होते. यावेळी डी के आरेकर यांचा केक कापून व शाल श्रीफळ देऊन पर्यावरण समितीच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.Plantation of trees to stop environmental degradation is the need of the hour-D K Arikar
त्यावेळी वर्ड पिंपळ गुलमोहर आवळा सीताफळ कडूलिंब इत्यादी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे तर प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव व पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मारल्यावर पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉक्टर देव कन्नाके वर्षा कोठेकर राणी राव प्रवीण जुमडे रंजना नागतोडे हरीश सहानी प्राध्यापक माधव गुरनुले प्राध्यापक बनसोड रंजना आरेकर संक्षिप्त शिंदे महेंद्र शेळके दत्ता तनिरवार स्वाती दुर्गम वार पौर्णिमा मेहरकुरे दिनेश एकवणकर अंजली साळवे रजनी मोरे बेनगिर भोवते वसंता हस्ते लक्ष्मण झुलमे एच एम भोवते शिल्पा कांबळे हरिराम ढोक बापूराव पारखी अजय गणवीर कल्पना आरिकर वैशाली रोहनकर प्रभाकर आवारी रजनी मोरे गौतम साहेब शुभांगी डोंगरवार रेखा जाधव सुधाकर मोकदम अमृतलाल राठी ज्योती कवठेकर पूजा शेर की सपकाळ साहेब ओम प्रकाश यंगलवार सुनील शेडमाके पठाण मॅडम अंजली साळवे रामेश्वर फुलले मेंडुलकर साहेब झुंबडे साहेब केशव मेश्राम वनश्री मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment