Ads

अल्पवयीन आदिवासी मुलीच्या मारहाण प्रकरणात ब्रम्हपुरीत जण आक्रोश मोर्चा

ब्रम्हपुरी :-अतिदुर्गम व तालुका मुख्यालयापासून लांब असलेल्या भुज येथे दिनाक 5 ऑक्टोंबर ला दसऱ्याच्या दिवशी रावण दहन आणी रावण पूजन कार्यक्रमा दरम्यान गावातील दोन गटात झालेल्या शुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले व त्यात भुज येथील नाबालिक आदिवासी मुलीला झालेल्या जबर गंभीर मारहाणीने प्रकरण चिघडले व पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली व आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकवटला असून आरोपीला अटक करा व कलमात वाढ करा,आदिवासी वरील अत्याचार थांबवा अश्या विविध मागण्यांकरिता ब्रम्हपुरी शहरात आदिवासी समाज व विविध संघटनेच्या वतीने आज मंगळवारी असंख्य आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Protest march in Bramhapuri in case of beating of minor tribal girl
आदिवासींचे हक्क आणि त्यांचा स्वीकार यात विरोधाभास आहे..! जो 'अन्याय' या नुसत्या शब्दाने समजू शकत नाही तर त्याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे,तालुक्यातील दुर्गम गाव"भुज" "Bhuj" या गावात विविध समाज एकत्र राहतात विजयादशमी सणाला काही समाज बांधव रावण दहणाची परंपरा जोपसतात तर काही रावण पूजनाची,गावातील सलोखा टिकून राहावा व त्योहाराला कसलाही गालबोट लागू नये म्हणून दोन्ही पक्षातर्फे पोलीस स्टेशनं येथे अगोदर समजोता सुद्धा झाला होता आणी उभय दोन्ही पक्ष्याच्या समजोत्याने कार्यक्रम पार पडणार असे ठरले होते मात्र कधीही गावात भांडण तंटा नसलेल्या साध्या भोड्या समाजात पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तैनात असतांना भांडण झाला व त्यात एका नाबालिक आदिवासी मुलीला मारहाण झाल्याची तक्रार होतं गावातील पाच लोकांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हाची नोंद झाली.

आपल्या समाजातील नाबालिक मुलीवर झालेल्या मारहानीच्या विरोधात आदिवासी समाजाने निषेध नोंदवत विविध संघटने मार्फत प्रशासनाला न्याय हक्काची मागणी करण्यात आली मात्र न्याय हक्कापासून आदिवासी समाजाला वंचित ठेवण्यात येतं असल्याचे समाजाच्या लक्षात येत असल्याने संपूर्ण आजूबाजूच्या क्षेत्रातील आदिवासी समाज एकत्र आला व ब्रम्हपुरी येथे मंगळवार रोजी बहुसंख्य समाजबांधवाच्या उपस्थितीत मोठा जण आक्रोश मोर्चा करण्यात आला
यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या मुळे तीव्र निषेध करित आरोपीला अटक झाली च पाहिजे. पोस्को अतंर्गत गून्हा दाखल झाला पाहिजे व शोषित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला पाहिजे असे घोषणा देत तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी येथे मोर्चा १०००० हजार संख्येने काढण्यात आले या मोर्चा चे नेतृत्व हरिष उईके गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले तसेच यात बापुजी मडावी जिल्हाध्यक्ष विजयसिंह मडावी कवडूजी पेंद्राम, डॉ प्रकाश वट्टी,अमित कन्नाके, अर्चना ताई खंडाते डॉ विजयकुमार खंडाते, घनश्याम कुळमथे यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा हा अगदी शांततेत पार पडला. परंतु काही वेळ मोर्चेकरी संतापुन शोषित मूलीला न्याय मिळाला पाहिजे व आजच अटक झाली पाहिजे यावर तणाव निर्माण केले यात तहसिलदार,ठाणेदार व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आम्ही आपल्या समाजाला व शोषित मूलीला न्याय मिळवून देण्याची खात्री दिली त्यानंतर मोर्चेकरी शांत झालेव मोर्चा हा शांततेत संपन्न झाला.

पोलिसांची भूमिका संशयास्पद पत्रकार परिषदेत आरोप
The role of the police is questionable in the press conference

पीडित, शोषित आदिवासी समाजातील एका नाबालिक मुलींबाबत घडलेल्या घटनेची ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनाने गांभीर्यपूर्ण दखल घेतली नसल्याने सदर प्रकरण उग्र रूप धारण करीत असल्याचे आदिवासी बांधवांचे आरोप असून आदिवासी बांधवांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार, सदर प्रकरणाची तक्रार पोलीस विभागाकडून हेतूपूरस्पर टाळल्या गेल्यानंतर रात्रौ दोन वाजताच्या सुमारास नोंद केल्या गेली मात्र मारहाण झालेली मुलगी नाबालिक आदिवासी असतांना तात्काळ अट्रॅसिटी ऍक्ट Atrocities Act अंतर्गत गुन्हाची नोंद करण्यात आली नाही तसेच विविध राजकीय हस्ताक्षेपा मुळे तक्रार दाखल करतांना विविध प्रकारे त्रास दिल्या गेला असल्याचे गंभीर आरोप पोलीस प्रशासनावर करीत न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका सुद्धा आदिवासी बांधवानी स्पष्ट केलेली होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment