चंद्रपुर : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोडणाऱ्या महाराष्ट्रातील ५६०० कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने त्यांच्या खात्यात जमा न केल्यामुळे यंदाही त्यांची दिवाळी अंधारात जाते की काय असे वाटू लागले आहे.
पूर्वी एक्सेस बँकेत समग्र शिक्षा अभियानाची निधी जमा होत होती. परंतु आघाडी सत्ता कोसळल्यावर युती शासनाने त्या बॅकचे खाते गोठवून एचडीएफसी बँकेत सदर खाते सुरू केले. शासनाच्या लहरी स्वभावामुळे त्या बँकेतील रक्कम वळती करण्यासाठी विलंब होत असल्याने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी नंतरच होणार असा अंदाज वर्तविला जात आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन नाही यामुळे कर्मचारी चिंतातुर झाले आहे.एक्सेस बॅक खात्यात एक महिण्याचा वेतन (ऑक्टोबर) निधी जमा असताना ऐनवेळी दुसऱ्या बँकेत शासनाने खाते काढून सदर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखलयाचा सुरू कर्मचारी व्यक्त करीत आहे.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्वीच्या बँकेचे बंद केले व दुसऱ्या बँकेत खाते सुरू केले. त्यांच्या लहरी धोरणामुळे कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतना पासून मुखावे लागत आहे. याची शासनाने गंभीर दखल घेवून दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे अन्यथा आंदोलन करू
सचिन देशट्टीवर
0 comments:
Post a Comment