Ads

ट्रक कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त PSI जागीच ठार .

मुल :मुल चंद्रपूर मार्गावरील आगडी जवळ आयसर ट्रक कार ची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले तर २ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना (१३ ऑक्टोंबर) सकाळी ११.३० दरम्यान घडली.
A retired PSI died on the spot in a horrific accident in a truck car
माणिक दशरथ कुमरे (६०) रा. मुल असे अपघातात ठार झालेल्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी शालीनी माणिक कुमरे (५० वर्षे) रा. मुल व चालक हेमंत मेश्राम रा. मारोडा हे गंभीर जखमी आहेत मात्र ट्रक चालकाला कुठलीही इजा झाली नाही. Road accident

बंगलोर वरून चंद्रपूर- मुल मार्गाने चालक किसन पटेल (२२ वर्षे) आयसर गाडी क्रमांक सी. जी. ०८ ए. टी. - ०७६९ ने अगरबत्ती घेऊन रायपूर येथे जात होता. तर मुल वरून चंद्रपूर ला खाजगी कामाकरीता सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आपल्या पत्नीला घेऊन खाजगी गाडी करून कार गाडी क्रमांक एम. एच ३१. डी. के. २३५० ने जात असताना समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल होऊन जखमींना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने दोघांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment