चंद्रपुर :सर्वसामान्य जनतेच्या हाकेला ओ देत विकासकार्य व लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातुन लोकसेवा करणारे कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातुनच भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. निःस्वार्थ, निरपेक्ष समाजसेवा करणारे कार्यकर्ते आमची शक्ती आहे, असे प्रतिपादन सांस्कृतीक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
Activists who listen to the call of the common people and preserve the spirit of service are the realstrengthof BJP-Sudhir Mungantiwar
दिनांक ८ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर तालुक्यातील अंभोरा, लखमापूर ग्राम पंचायतींचे सरपंच, उपसरंच व ग्राम पंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. तसेच लोहारा येथील सरपंच किरण सिध्दार्थ चालखुरे, सावित्रीबाई महिला बचतगट लखमापूर च्या सदस्य महिलांनी भाजपात प्रवेश घेतला. ज्येष्ठ कार्यकर्ते ब्रजेश सिंग सेंगर यांनी त्यांच्या सहकार्यांसह भाजपात प्रवेश घेतला.
नवप्रवेशित भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सावित्रीबाई महिला बचतगट लखमापूर येथील सौ. सोनी साखरे, सौ. ज्योती मेश्राम, सौ. संतोष मेश्राम, सौ. दुर्गा बर्डे, सौ. प्रतीभा सोनवाने, आंबोरा ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ. शारदा महेश राजुकर, उपसरपंच प्रभाकर हरी ताजणे, ग्राम पंचायत सदस्य, माजी अनंतराव मिलमिले, लवलेश निशाद, सौ. लता चिकराम, सौ. सुरेखा खुबरे, सुदाम राजुरकर, रामदास थेरे, सुरेश ताजणे, गजानन मत्ते, रोहन लोहकरे, माजी उपसरपंच भारत चव्हाण, पंचराम साहू, उत्तम शेरकुरे, संतोष चांदेकर, गोविंद किन्नाके, मनबोध निर्मलकर, धनराज निर्मलकर, संतोष जुनारकर, राजकुमार शर्मा, मनोज गोंड, सलीम शेख, सत्या सोनकर, अनुप यादव, भागेश कोट्टावार, तपश शहा, राजू शेख, शैलेश सिंग, इरफान सिद्दीकी त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरातील क्रिडा क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींनी सुध्दा भाजपात प्रवेश घेतला. नवप्रवेशित भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन भाजपाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी नवप्रवेशित भाजपा कार्यकर्त्यांचे दुप्पटे प्रदान करून त्यांनी स्वागत केले व शुभेच्छा दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे महानगर भाजपा कोषाध्यक्ष, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्हा सरचिटणीस नामदेव डाहूले, महानगर महिला अध्यक्षा सौ. अंजली घोटेकर, हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, गौतम निमगडे, अनिल डोंगरे, गंगुबाई मडावी, यश बांगडे, राजकुमार आकापल्लीवार, मनोज मानकर, प्रविण चोपकर, अंकीत चिकटे, प्रसन्नजीत निमगडे यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment