भद्रावती तालुका प्रतिनिधी:- पैशाची कोणतीही अवास्तव उधळपट्टी न करता शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांनी आपला वाढदिवस शहरातील गरीब, गरजूंना ब्लॅंकेटचे वितरण व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाश्ता, मिठाईचे वितरण करून आपला वाढदिवस साजरा केला व समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला.
वाढदिवस म्हटले की पार्ट्या जेवण खावं असा अवास्तव खर्च आला मात्र या परंपरेला फाटा देत माझी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर यांनी अत्यंत साधेपणाने व सामाजिक उद्दिष्ट समोर ठेवून आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी आज सकाळी कुटुंबासह शहरातील सुप्रसिद्ध वरद विनायकाचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिर परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वितरण केले. त्यानंतर श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात जाऊन तेथील मुलांना नाश्ता तथा मिठाईचे वितरण करून त्यांच्यासोबत वेळ घालविला व त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे विचारपूस केली यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, पत्नी सुनंदा डुकरे, मुलगा शुभम व सून पूजा आधी कुटुंबासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तथा भद्रावती भूषण भैय्याजी मिरगे, भद्रावती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नितीन सातभाई आदींसह अनेक मान्यवर मंडळींची व मित्र परिवारांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment