(प्रशांत गेडाम): तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर - मूल हायवे वरील सावरगावच्या बस स्टॉप जवळच सोमवार दि. 23 जानेवारी ला दुपारी 2:30 वाजता सुमारास मूल कडून नागपूरकडे जाणारी मा दुर्गा ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.49 जJ.0916 असा ट्रॅव्हल्स ही भरधाव वेगात असुन ट्रॅव्हल्स ने जोरदार अशी दुचाकी क्रमांक 34 व्ही 36 99 ला मागून धडक दिल्यामुळे चंदू रामजी बोरकर वय पन्नास वर्षे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान त्याचे मृत्यू झाले.Maa Durga Travels hit a two wheeler at Savargaon; Man killed in the collision
या आधी त्यापूर्वी सावरगाव येथील बस स्टॉप वर 12 जानेवारीला गावातील युवक, कैलास कुकसू गेडाम वय 35 वर्ष हा भरदार टिप्परच्या अपघातात जागीच ठार झाला होता. त्यानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन सिंदेवाही च्या दिशेने पळुन गेला होता. लोकांनी पाहून सुद्धा रंगाचा तो टिप्पर पोलिसांना मिळाला नाही.
मात्र त्यानंतर गावातील संतप्त जमावाने सलग अडीच तास संतप्त लोकांनी रस्ता जाम करून ठेवलेला होता.
0 comments:
Post a Comment