घुग्घूस : येथील अमराई वॉर्डात 26 ऑगस्ट 2022 रोजी भुसख्लनात एक घर सत्तर ते शंभर फूट जमिनीत गाडल्या गेले सदर जमिनीत इंग्रज कालीन भूमिगत खाण असल्याने व खाणीत वाळू भरली नसल्याने ही जागा नागरिकांच्या राहण्यास अयोग्य असल्याने सदर वस्ती खाली करण्यात आली.Amarai landslide ! Land records officials inspected the site
व नागरिकांनी जिल्हापरिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
सदर घटनास्थळी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी भेट देऊन नागरिकांना हक्काचे घर मिळायलाच पाहिजे ही भूमिका घेतली व घर मिळे पर्यंत सात महिने वेकोलीतर्फे प्रतिमाह तीन हजार रुपये घरभाड्या पोटी मिळवून दिले.
नागरिकांना शासकीय जमीन मंजूर करून त्यांना स्थायी घरपट्टे देण्यासाठी सदर प्रकरणात अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,
किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,,यांनी सतत पाठ पुरवठा केला असता शासनाने महसूल विभागाची सर्व्ह 29/1 ही सहा एकर जागा मंजूर करण्यात आली असून आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेक्षक दत्तात्रेय राठोड यांनी जागेची मोजणी करून सिमा बांधणी केली
यावेळेस काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार,सुरज बहुराशी,व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
0 comments:
Post a Comment