Ads

कृषी महोत्सव प्रयोगशील शेतक-र्यांना प्रगतशील बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :आजचा काळ बदलला असुन तंत्रज्ञाण विकसीत झाले आहे. अशात प्रगतशील शेतक-र्यांच्या माध्यमातून शेतक-र्यांना विचार मंथन करुन विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. कृषी महोत्सव हे यासाठी महत्वाचे व्यासपीठ असुन हे महोत्सव प्रयोगशील शेतक-र्यांना प्रगतशील शेतकरी बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चांदा क्लब मैदानावर धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती द्वारा पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूरच्या वतीने कृषी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. आज या कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती होती. तर शिक्षक विभागाचे नवनिर्वाचीत आमदार सुधारकर अडबाले, शेतकरी नेते तथा माजी आमदार वामनराव चटप, राजुरा विधानसभाक्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गि-हे, माजी नगराध्यक्ष मनोहर पाऊनणकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी उपमहापौर राहुल पावडे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पु देशमुख, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, अरुन मालेकर, श्रीधर मालेकर, बाबासाहेब वासाडे, माजी नगर सेवक सचिन भोयर, माजी नगर सेवीका सुनिता लाढीया, देवानंद वाढई यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कृषी क्षेत्रासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मतदार संघातील शेतक-र्यांची शेतीच्या पाण्याची अडचण सुटावी याकरीता माझे प्रयत्न सुरु आहे. आपण वर्धा नदीवर धानोरा बॅरेज तयार करण्यासाठी 600 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. तसा प्रस्तावही आपण शासनाला पाठवला आहे. तर विचोडा पडोली येथे दोन छोटे बॅरेज आपण तयार करत आहो. याच्या कामाला सुरवात झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर तालुक्याला कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीतुन वगळण्यात आले होते. तेव्हा आपण तत्कालीन सहकार मंत्री यांना चंद्रपूर तालुक्याच्या कापुस उत्पादक तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सत्ता परिवर्तण झाल्यावर आपल्या मागणीची दखल घेत विद्यमान सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर तालुक्याचा कापुस उत्पादक तालुक्यांमध्ये समावेश केल्याचेही ते यावेळी म्हणाले.
बदतल्या काळाबरोबर शेतक-र्यांपुढेही मोठी आवाहणे उभी राहत आहे. नव्या - नव्या पिक रोगांचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शेतक-र्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. असे कृषी मेळावे शेतक-र्यांसाठी हितदायक ठरु शकतात. या कृषी महोत्सवातुन शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होईल अशी अपेक्षा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. धनोजे कुणबी समाजाने घातलेला हा नवा पायंडा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. प्रत्येक सामाजिक कार्यात धनोजे कुणबी समाज हा अग्रस्थानी असतो अशा शब्दात यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजक धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समीतीचे कौतुक केले. या कृषी मेळाव्याला समाज बांधवांसह शेतक-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment