Ads

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत व्हालिबाल मधे शिंदे कनिष्ठ महाविद्यालय तर कबड्डीत प्रियदर्शनी आयटिआय अव्वल. In taluk level sports competition, Shinde Junior College topped in Volleyball and Priyadarshini ITI topped in Kabaddi.

भद्रावती तालुका प्रतिनिधी :
स्थानिक प्रियदर्शनी खासगी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर दोन दिवसीय तालुकास्तरीय शैक्षणीक क्रिडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत व्हालिबाल व कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या यात व्हालिबाल स्पर्धेत शहरातील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाने तर कबड्डी स्पर्धेत प्रियदर्शनी खासगी आयटिआय च्या संघांनी आपल्या खेळाचे ऊत्कृष्ट प्रदर्शन करीत स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केले.In taluk level sports competition, Shinde Junior College topped in Volleyball and Priyadarshini ITI topped in Kabaddi.

या स्पर्धेत तालुक्यातील व्हालिबाल च्या दहा तर कबड्डीच्या दहा संघांनी भाग घेतला.व्हालिबाल स्पर्धेच्या अंतीम सामण्यात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाने आपला प्रतिस्पर्धी संघ प्रियदर्शनी खासगी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या संघावर मात करीत अजिंक्यपद पटकावले यात प्रियदर्शनी खासगी औद्योगीक संस्थेचा संघ उपविजेता ठरला.कबड्डी स्पर्धेच्या पार पडलेल्या अंतीम सामण्यात प्रियदर्शनी खासगी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या संघाने आपला प्रतिस्पर्धी संघ श्री साई खासगी आयटिआय संघावर मात करीत अजिंक्यपद पटकावले. यात श्री साई आयटिआय चा संघ उपविजेता ठरला.सदर विजेत्या व ऊपविजेत्या संघांना सन्मानचिन्ह व रोख देऊन गौरविण्यात आले.यावेळी पार पडलेल्या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनील धानोरकर, इंटकचे महासचिव के.के. सिंह,संस्थेचे संचालक तथा माजरी वेकोली इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, नरेंद्र गुंडावार, राजेंद्र गुंडावार, शंकर दास,किसन रावळे आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेला शहरातील प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment