चंद्रपुर :बॉडी बिल्डर्स ॲन्ड फिटनेस असोसिएशन, विदर्भ यांच्या मान्यतेने, चंद्रपूर जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, गॉड पावर जिम द्वारा आयोजित भव्य जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा " मिस्टर चंद्रपूर श्री-2023""Mr. Chandrapur Shree-2023"चे आयोजन शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.on18th Feb grand district level bodybuilding competition Mr Chandrapur Shree 2023 Organised
प्रमुख बक्षिसांमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी व प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट पोझर रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट मसलमन ट्रॉफी व प्रमाणपत्र, वजन गटात प्रथम पारितोषिक चषक व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रोख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे आहे. तृतीय पारितोषिक चषक व प्रमाणपत्र, चौथे पारितोषिक चषक व प्रमाणपत्र, आकर्षक भेट, पाचवे पारितोषिक रोख, चषक, प्रमाणपत्र, आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाईल, खेळाडूंचे वजन स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत घेतले जाईल. स्पर्धकाने आपले आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. स्पर्धेत कोणतेही अनैतिक कृत्य करू नका, अन्यथा पोलिस कारवाई केली जाईल, न्यायाधीशांचा निर्णय अंतिम असेल. अधिक माहितीसाठी CBBFA चंद्रपूरचे कार्याध्यक्ष खेमराज हिवसे,मो. 88886 66302 सचिव सुभाष लांजेवार मो. 8888539100, विवेक बुरडकर कोषाध्यक्ष ,मो.9890550449 ,विशालभाऊ डॉ. निंबाळकर, अध्यक्ष चंद्रपूर बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन. चंद्रपूर येथे संपर्क साधता येईल.
0 comments:
Post a Comment