भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तालुक्यातील तिरवंजा परीसरातील जंगलात सुरु असलेल्या कोंबडबाजारावर धाड टाकुन 7 लाख53 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
तर अन्य जवळपास चौदा आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले आहे.Illegal chicken market raided in Tirwanja forest area.
सदर कारवाई भद्रावती पोलिसांकडून तालुक्यातील तिरवंजा गावाशेजारील जंगल परिसरात करण्यात आली. सदर तिरवंजा येथील जंगल परिसरात कोंबडबाजार सुरु असल्याची गोपणीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले असता तेथे कोंबडबाजार सुरु असल्याचे आढळून आले.या बाजारावर पोलिसांनी धाड टाकुन केलेल्या कारवाईत नव जिवंत कोंबडे,बारा वाहणे,धारदार लोखंडी काथ्या असा एकुण 7 लाख 53 हजार 630 रुपयांचा जप्त करण्यात आला व सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.तर अन्य आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.सदर कारवाई ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मुळे सा,नापोशि अनुप आष्टुनकर, नापोशि विश्वनाथ चुदरी, पोअं चेतन झाडे, रोहित चिटगिरे, योगेश घाटोळे, शैलेष द्रुगवार यांचे मदतीने केली असुन गुन्हयाचा पुढील तपासभद्रावती पोलिस करीत आहे.
0 comments:
Post a Comment