चंद्रपूर : जगात सर्वात जास्त सन्मान महिलांचा केला जातो. आई म्हणून केवळ जन्म न देता राष्ट्र घडविण्याचे काम आज स्त्री करताना दिसत आहे. महिला आज बचतगटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्या कुक्कुटपालन, शेती आणि अन्य व्यवसाय उद्योग करून कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीस हातभार लावीत आहे. शासनाच्या योजनाचा लाभ घेऊन बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.Become self-reliant through savings group: MLA Pratibhatai Dhanorkar
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालोरी येन्सा ब्लॉक, मजरा लहान येथे भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच शालेय मुलांना कपडे वाटप कार्यक्रम, दिव्यांग व्यक्तींना कपडे वाटप, महिला बचत गट, अगंणवाडी सेविका व आशा वर्कर तसेच ४० वर्षापूर्वी बचतगत संकल्पना नव्हती तेव्हा १०४ वर्षीय बहिणाबाई काळे यांनी बचतगट निर्माण केला होता. त्यांच्याही यावेळी सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिक मदत यावेळी देण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, गोवा सरकारचे पुरस्कार प्राप्त शिक्षक रवींद्र तीरानिक व निरज आत्राम यांच्या देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती वरोरा माजी उपसभापती संजीवनी भोयर, सवर्ग विकास अधिकारी गोडशेलवार, ग्रामसेवक एकनाथ चाफले, प्रिया पाटील, सादिया खान, रवींद्र तीरानिक, सादिक थैम. वैभव साखरकर, अनिता पाटील, मजरा सरपंच वंदना निब्रड, मजरा उपसरपंच प्रमोद तोडासे, सरपंच जया चिंचोलकर, येन्सा उपसरपंच सुरेखा लभाने, निमसडा सरपंच चौधरी, उपसरपंच मजरा डंभारे, मुख्याध्यापिका शीतल शर्मा, चिनोरा सरपंच जुमनाके, चिनोरा माजी सरपंच सुशीला तेलमोरे, आनंदवन सरपंच रुपवंती दरेकर, अनिता आत्राम, प्रतिभा मानकर, निरल आत्राम, ढोके, गांधी बोरकर, हर्षल निब्रड, गणेश काळे, ग्यानिवंत गेडाम, सारिका धाबेकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, महाराष्ट्र हे महिला धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य असून महिला अधिकारासाठी महाराष्ट्र नेहमी पुढे राहिला आहे. 2012 मध्ये उमेदची स्थापना झाली आणि उमेदची झेप पाहता अन्य राज्येही त्याचे अनुकरण करत आहेत. बचतगटांनी आपल्या गावाची गरज लक्षात घेऊन तीच उत्पादने तयार करावीत. त्या उत्पादित मालाचे ब्रेडींग आणि पॅकेजिंग करण्यात बचत गटाचा सहभाग राहिल्यास बचत गट नक्कीच आत्मनिर्भर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले
0 comments:
Post a Comment