Ads

आठवडा लोटूनही चोरटे अजूनही मोकाट..!

कोरपना:-गडचांदूर येथील राजीव गांधी(पेट्रोल पंप) चौक,रेल्वे स्टेशन रोड वरील मे.रणदिवे यांच्या दारू दुकानात गेल्या 6 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी दारू दुकानाचे शटर व लाकडी दरवाजा सबलीने तोडून 25 पेक्षा जास्त राकेट कंपनीच्या पेट्या एका निळ्या रंगाच्या कारमध्ये टाकून पोबारा केला.नेहमी प्रमाणे पोलीसांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती पाहणी व चौकशी करून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज सोबत नेले.असे असताना सदर घटनेला एक आठवडा लोटला तरीपण चोरट्यांचा थांगपत्ता काही लागला नाही.Thieves get away with looting for a week..!
चोरांना शोधण्यात गडचांदूर पोलीस अपयशी ठरत असल्याचे आरोप होत असून घटनेच्या रात्री शहरात चौका चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे जर सुरू असते तर चोरांना शोधण्यात याची मोठी मदत पोलीसांना झाली असती.मात्र काही दिवसांपासून हे सीसीटीव्ही कॅमेरे निव्वळ शोभेची वस्तू बनून असल्याचे चित्र आहे.आठवडा लोटूनही चोरटे बिनधास्त मोकाट फिरत असल्याने गडचांदूर पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून 90 हजार रूपये किमतीच्या 25 पेट्या,गल्लेतील काही रोकड,चोरांनी निकामी केलेले सीसीटीव्ही कॅमेरे व इतर वस्तूचे नुकसान,असे जवळपास एक ते दीड लाख रूपयांचा फटका सदर दारू दुकानदाराला बसला असून नुकतेच रूजू झालेले नवीन ठाणेदारांनी याकडे जातीने लक्ष देऊन चोरांना जेरबंद करावा अशी मागणी होत आहे.आता पोलीसांना चोरटे केव्हा गवसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment