Ads

पिपरबोडी व आयुध निर्माणी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील आयुध निर्माणी परिसर तथा लगतच्या पिपरबोडी गावात धुमाकुळ घालून नागरिकांत आपली दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर भद्रावती वनविभागाला यश प्राप्त झाले.दिनांक 18रोज शनिवारला पहाटेच्या सुमारास हा बिबट्या आयुध निर्माणी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलेले भक्ष खाण्यासाठीआला आणी अलगद अडकला.सदर बिबट्या जेरबंद झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.The leopard that was roaming in the area of ​​Piperbodi and Ordnance Factory was finally arrested.
गेल्या पंधरा दिवसांपासून या बिबट्याने निर्माणी वसाहत व लगतच्या पिपरबोडी गावपरिसरात धुमाकूळ घातला होता.या बिबट्याने आजपर्यंत चार जणांवर हल्ला करुन त्यांना किरकोळ जखमी केले होते.या परिसरातील पाळीव प्राण्यांवरही या बिबट्याने हल्ले केले होते.बिबट्याच्या या ऊपद्रवामुळे परिसरातील नागरीक,लहान मुले तथा पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला होता.बिबट्याची परिसरातील दहशत लक्षात घेता या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पिपरबोडी येथील गावकऱ्यांनी भद्रावती वनपरिक्षेत्राकडे केली होती.याची दखल घेत पिपरबोडी व निर्माणी वसाहतीत गेल्या पाच दिवसांपासून तिन पिंजरे लावण्यात आले होते व त्यात नियमीत भक्ष ठेऊन यावर नजर ठेवण्यात आली होती.अखेर निर्माणी वसाहतीत लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला.त्याला गंदा नाला परिसरातील नर्सरीत ठेवण्यात आले असुन त्याला त्याच्या सुरक्षीत अधिवासात सोडण्यात येणार आहे.सदर कार्यवाही क्षेत्रसहाय्यक विकआस शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक निखीत चौरे,आदेश कुमार शेंडगे अंकुश येवले यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment