भद्रावती प्रतिनिधी( जावेद शेख) :- 29 जानेवारी ला झालेल्या जागतिक अलामा अब्याकस स्पर्धेत मुरसा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक श्री. एस एच मानकर यांचा मुलगा तसेच भद्रावती येथील साई कॉन्व्हेंटच इयत्ता पाचवी चा विद्यार्थी स्पंदन मानकर याने जगातून दुसरा नंबर पटकाविला.
या वर्षी तीसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या 18 व्या अलामा अब्याकस स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात गणितीय उदाहरणाची सोप्या पद्धतीने उत्तरे काढणाऱ्या या अभिनव स्पर्धेत स्पर्धकांना 7 मिनिटात 120 प्रश्न विचारण्यात आले होते, यात जगातील ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मलेशिया, अबुधाबी, सिंगापूर, सौदी अरेबिया, इराण, भारत या देशातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते, यात ज्युनियर गटात भद्रावती च्या स्पंदन श्रीमंत मानकर याने जगातून दुसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे स्पंदन 2020 मध्ये देशात पहिला आला होता तर 2022 मध्ये पण जगात दुसरा आला होता
याचा नुकताच हैद्राबाद येथे अलामा अब्याकस चे दिग्दर्शक श्री जी मुथुकुमार अय्यर, मिनाक्षी नेरकर मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला
तो आपल्या यशाचे श्रेय आई रेणू मानकर, वडील श्रीमंत मानकर, अलामा अब्याकस चे दिग्दर्शक पद्मावती मुथुकुमार, जी मूथुकुमार अय्यर, वाणी रामजी मॅडम, शिक्षिका मिनाक्षी नेरकर व टी. एस. नेरकर सर यांना देतो, या यशाबद्दल स्पंदनचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे
0 comments:
Post a Comment