भद्रावती तालुका प्रतिनिधी: दिनांक 27 मार्च रोजी आम आदमी पार्टी तालुका भद्रावती तर्फे आम आदी पार्टी महाराष्ट्र तर्फे निर्देशित केल्याप्रमाणे विज बिल दरवाढी विरोधात राज्यव्यापी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग करीत आंदोलन यशस्वी करण्यात आले. दिनांक 27 मार्चला ठीक 11.30वाजता बाळासाहेब ठाकरे गेट समोर आम आदमी पार्टी पार्टीच्या तालुका आणि शहर कार्यकारणीचे संपूर्ण पदाधिकारी एकत्र येऊन राज्य सरकारच्या भविष्यामध्ये विज बिल मध्ये 37% ची दरवाढ विरोधात नारे लावण्यात आले.Agitation by Aam Aadmi Party Bhadravati against increase in electricity bill and to meet 300 units per month electricity bill free of cost..
राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा निर्माण करण्याचं षडयंत्र आहे. जर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देत नाही तसेच कर्मचाऱ्यांना, मजुरांना योग्य वेतन देत नाही पण अदानीच्या कोळशाला मात्र योग्य भाव दिला जातो आणि सर्वसामान्यांवरती वीज दरामध्ये 37% वाढ करून अन्याय करत आहे. अन्याय सर्वसामान्य कधी सहन करणार नाही, म्हणून वेळेच्या आत हा जुलमी निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा नाहीतर आम आदमी पार्टी सर्वसामान्यांना घेऊन रस्त्यावर यापेक्षा तिव्र आंदोलन करेल असे आव्हान शासनाला तसेच प्रशासनाला दिले. आम आदमी पार्टी सदैव सर्वसामान्यांच्या हितामध्ये आणि सर्वसामान्यांवर होणाऱ्या सरकारच्या जुलमी निर्णयाविरुद्ध रस्त्यावर येईल आणि सर्वसामान्य न्याय मिळवून देईल असे आश्वासन सोनाल पाटील तालुका अध्यक्ष भद्रावती यांनी सर्वसामान्य जनतेला दिले.
दिल्ली आणि पंजाबच्या ऊर्जेची निर्मिती न होता 300 युनिट वीज मोफत दिले जाते तर महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊन सुद्धा महाराष्ट्र शासन जनतेला मोफत वीज का बर देत नाही त्याउलट विज बिलामध्ये प्रति युनिट विज जर वाढवणे हा अतिशय सर्वसामान्यांप्रती निंदनीय आणि अदानी समूहाप्रती सहानुभूती दर्शवणारा निर्णय आहे. अशा शब्दांत आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सुरज शहा यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यानंतर शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम राज्य शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवत ही सर्वसामान्यांची सरकार नाही तर ही अदानी अंबानी ची सरकार आहे. या पद्धतीने टीका व्यक्त केली. त्यानंतर दिल्ली तसेच पंजाब सरकार वर शिक्षण, आरोग्य, विज सारख्या मूलभूत सुविधा मोफत देऊन सुद्धा सरकारवर कोणते मोठे कर्ज नाही असे वक्तव्य शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी दिले. यानंतर शहर सचिव विजय सपकाळ, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर यांनी सुद्धा या दरवाढीचा निषेध करत सक्रिय सहभाग नोंदवली. आंदोलनाची समाप्ती होताच तालुकाध्यक्ष सोनाल पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये तसेच शहराध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना तहसीलदारांमार्फत तसेच कार्यकारी अभियंता महाराष्ट्र विज वितरण यांना निवेदन सादर करण्यात आले.विज दरवाढीच्या विरोधातील राज्यव्यापी आंदोलनाला यशस्वी बनवण्यासाठी संपूर्ण भद्रावती तालुका तसेच शहर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी तालुका भद्रावती संयोजक सोनाल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर ,तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे ,आम आदमी पार्टी भद्रावती शहर संयोजक सुरज शहा शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक हर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजय सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभा कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा शहर सचिव अतुल रोडगे, मंगेशभाऊ खंडाळे, सुधिरभाऊ घांगळे, प्रफुल्लभाऊ शेलार, बाळाभाऊ पिंपळकर नंदुरी, दिलीप कापकर, गौरव चांदेकर, शुभम भोसकर, श्यामभाऊ पिंपळकर, नितीनभाऊ देवगड़े, रितेशभाऊ नगराळे, राजेशभाऊ नरवडे, बाळू बांदुरकर, प्रदीपभाऊ लोखंडे, चेतनभाऊ खोब्रागडे, संजयभाऊ सातपुते, डोरीभाऊ स्वामी, व्यापारी आघाडी प्रमुख घनश्यामभाऊ गेडाम, आनंदभाऊ पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.
0 comments:
Post a Comment