भद्रावती :-भद्रावती शहरातील गुरुनगर येथील एका खासगी प्लाटवर जिओ कंपणीचा टावर ऊभारण्याला परवानगी देण्यात आली आहे.या टावर ऊभारणीला वार्डातील नागरिकांचा विरोध आहे.त्यामुळे येथील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या टावरची मान्यता रद्द करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यामान नगरसेविका सरीता सुर यांनी केली असुन यासाठी त्यांनी भद्रावती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले आहे.Cancel approval of Jio Tower in Guru Nagar: Councilor Sarita Sur.
या निवेदनाच्या प्रतिलिपी नगराध्यक्ष तथा ऊपाध्यक्षांनाही देण्यात आल्या आहेत.गुरुनगर वार्डात सदर जिओ टावरची मान्यता दिल्यापासून वार्डातील नागरिकांत असंतोष निर्माण झाला असुन वार्डातील नागरीक या टावर ऊभारणीस विरोध करीत आहे.या टावरमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रीक चुंबकीय लहरींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात असे वार्डातील नागरिकांना वाटत आहे.त्यामुळे सदर टावर हा वार्डात नको अशी त्यांची भुमीका आहे. त्यामुळे सदर टावरची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सरीता सुर यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले यावेळी अशोक ऊरकुडे,कल्पना ऊरकुडे,राहुल खोडे,लिमेश जिवतोडे, सोमेश्वर कुडे,प्रेमीला कुडे,संगीता आसेकर,दिवाकर बोडे आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment