चंद्रपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. यातून ओबीसीचे आम्हीच हितचिंतक असल्याचा देखावा केंद्र सरकार आणि भाजपकडून केला जात आहे. भाजप आणि केंद्र सरकारला ओबीसींवरील खरे प्रेम दाखवायचे असेल, तर संपूर्ण राष्ट्राला ओबीसी राष्ट्र म्हणून जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिले आहे.Show OBC Love by declaring OBC Nation
राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात रविवारी (ता. २६) संकल्प सत्याग्रह करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता आयोजित आंदोलनात खासदार धानोरकर बोलत होते.
काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारचा खरा हुकुमशाहीवृत्तीचा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर आणला. आता अदानीच्या कंपनीकडे तब्बल २० हजार कोटी रुपये आले कुठून, असा प्रश्न विचारण्यात येणार होता. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध देशासमोर आले असते. यासर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठीच मोदी सरकारने राहुलजी गांधी यांची खासदारकीच रद्द करण्याचा निर्णय घेतला, असल्याचेही खासदार धानोरकर यावेळी म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, कामगार नेते के. के. सिंग, सेवादलचे अध्यक्ष नंदू खनके, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शफाक शेख,, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ताजू शेख, ओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव प्राचार्य नरेंद्र बोबडे, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव नंदू वाढई, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, सुनीता अग्रवाल, माजी नगरसेविका सकिना अन्सारी, विना खनके, सुनीता लोढिया, अनुताई दहेगावकर, वसंता देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर, तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक जयस्वाल राजू रेवल्लीवार, दुर्गेश कोडाम, यंग चांदा ब्रिगेडचे कलाकार मलरप्पा, राहुल चौधरी, युसुफ भाई, गोपाल अमृतकर, पप्पू सिद्दीकी, प्रसन्ना शिरवार, बापू अन्सारी, राजेश वर्मा, संजय गम्पावार, अंकुर तिवारी, काशिफ अली, राजीव खजांजी, नौशाद , शेख, विजय धोबे, रवी भिसे, राजू वासेकर, वंदना भागवत, स्वप्नील चिवंडे, मनोज खांडेकर, स्वाती त्रिवेदी, विजय पोहंकर, मुन्ना तावडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment