चंद्रपुर : संघर्ष आणि त्यातुन घडलेला परिवार, हा अम्माचा प्रवास विपरीत परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्यांना सकारात्मकता देणारा आहे. संपन्नता आल्यावर समाजाला परत करण्याची उदारता किंचितच दिसुन येते. मात्र अम्मा यातही मागे नाही. त्यांच्या मार्फत सुरु असलेला अम्मा का टिफिन हा उपक्रमाची राज्यात नोंद घेतल्या जाईल. एकंदरीत अम्माचा जीवनप्रवास समाजाला प्रेरणा देणा-या एखाद्या सिनेमाच्या पटकथेला साजेसा असाच आहे. अशी भावना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.Amma's life journey is like a screenplay of a movie that inspires the society- Director Nagaraj Manjule
एका मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे आज चंद्रपूरात होते. या दरम्यान त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी येत अम्मा का टिफिन या उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी अम्माचीही भेट घेतली असून उपक्रमाची सर्व माहिती जाणुन घेतली. यावेळी नागराज मंजुळे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, सैराट, झुंड सिनेमातील अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री सायली पाटील, झी स्टुडिओज मराठी बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, झी स्टुडिओज काॅन्टेड हेड अश्विन पाटील, भरत मंजुळे, यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी संपुर्ण टिमचे शाल, श्रीफळ, संविधान पुस्तक आणि माता महाकालीची मुर्ती देत स्वागत केले. या प्रसंगी गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, कॉंग्रेस सेवा दलचे सुर्यकांत खनके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने अम्माचा टिफिन हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रमा अंतर्गत गरजू नागरिकांना घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविल्या जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. विशेष म्हणजे सदर उपक्रम अम्मा आणि आमदार जोरगेवार यांच्या वतीने स्वखर्चाने राबविण्यात येत आहे. दरम्यान आज शुक्रवारी सैराट हा सुप्रसिध्द सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि या सिनेमात काम केलेले अभिनेता आकाश ठोसर यांनी या उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती जाणुन घेत अम्माचा टिफिन उपक्रमातील कर्मचारी सहकारी यांचीही भेट घेतली.
याप्रसंगी नागराज मंजुळे यांनी अम्माशी मनखुलास गप्पा करत त्यांच्या प्रवासा बदल माहिती घेतली. यापुर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय समाजिक क्षेत्रातील नामवंतांनी अम्मा का टिफिन या उप्रकमाला भेट दिली आहे.
0 comments:
Post a Comment