भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:रात्रीचा फायदा घेत रेतिची तस्करी करीत असलेले तीन ट्रैक्टर भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खणीज पथकाव्दारे पकडण्यात आले.सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात गौण खणीज पथकाने दिनांक 24 रोज शुक्रवारी दुपार नंतर तालुक्यातील विलोडा येथील नदिघाटावरील केली.
सदर रेतितस्करितील ट्रैक्टर महसुल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असुन त्यावरील कारवाई सुरु केली आहे.या घटनेत जवळपास एक लाख रुपयांच्या वर दंड आकारण्यात येईल असा अंदाज आहे.सदर विलोडा नदिघाटावरुन नेहमी रात्रोच्या व दिवसा वेळला रेतिची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार अनिकेत सोनवणे व त्यांच्या पथकाने प्रथम घटनेच्या आदल्या दिवशी घटनेच्या दिवशी वेगळे नियोजन करुन पथकाने घाटाची अचानक पाहणी केली असता सदर ट्रैक्टर रेतिची तस्करी करतांना आढळून आले.त्यावर कारवाई करण्यात आली.सदर ट्रैक्टर मालकाचे नाव,राणे, बागेसर, तांनिरवार असुन तो विलोडा, मुढोली, काटवाल येथील रहिवासी असल्याचे कळते.या घटनेची पुढील कारवाई तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वातनायब तहसीलदार,शंकर भांदकर,नायब तहसीलदार मलिक पठाण ,तलाठी पुसनाके तलाठी मस्केहजर होते . सदर रेतिघाटाचा अद्याप लिलाव झाला नसल्याने या घाटासोबतच तालुक्यातील अन्यत्र अवैध रेतिव्यवसायाला जोर पकडला आहे.या रेतितस्करांवर आळा घालण्यासाठी रेतितस्करांविरोधात मोहिम सुरु असल्याचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांनी सांगीतले आहे.
0 comments:
Post a Comment