Ads

न. प. भद्रावती मार्फत स्वच्छतेची मशाल मार्च "

भद्रावती तालुका प्रतिनिधी:- दिनांक ०७/०३/२०२३ ते दिनांक ३०/०३/२०२३ या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छते मधील नेतृत्व वृद्धींगत करण्यासाठी "स्वच्छोत्सव- २०२३" "Swachhotsav2023" अभियान राबविण्याबाबत सह सचिव तथा राष्ट्रीय अभियान संचालक, केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी सूचित केलेले आहे, या मोहिमेचा मुख्य उद्देश्य महिलांच्या स्वछतेमधील सहभागापासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वछतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हा आहे, Torch March of Cleanliness By Municipality Bhadravati"
त्याअनुषंगाने Womens Icons Leading Swachhta (Wins Award 2023) व स्वच्छता जागृती फेरी स्वच्छता शपथ रॅलीचे आयोजन करण्यासंबंधीच्या सूचना शासनाकडून प्राप्त होत्या त्यानुसार भद्रावती शहरात "जागतिक शून्य कचरा दिनाच्या निमित्ताने Womens cons Leading Swachhta (Wins Award 2023) व दिनांक २९/०३/२०२३ ला सकाळी १० वाजता स्वच्छता जागृती फेरी / स्वच्छता शपथ रॅलीचे चे आयोजन न.प. कार्यालय भद्रावती येथून करण्यात आले त्यात न.प. भद्रावतीचे मा. अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, मा. मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, सर्व सन्माननीय सदस्य, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील बचतगटातील महिला यांचा समवेश होता दरम्यान मा. अध्यक्षांच्या हस्ते माशालीस पेट देऊन स्वच्तेच्या घोषणांच्या गजरात मशाल बचत गटातील महिलांच्या प्रतिनिधित्वाने शहरात फिरविण्यात आली, त्यानंतर न.प. सभागृह येथे सदर कार्यक्रमा विषयी बोलताना मा. अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांनी महिलांचा स्वच्छतेच्या बाबतीतील सहभागाबाबत मार्गदर्शन केले तसेच नुकतीच स्वच्छता यात्रा अंतर्गत भद्रावती शहरातील रुक्साना शेख यांची दिल्ली येथे प्रशिक्षणा करीता निवड करण्यात आली याबबत माहिती दिली तसेच नागपुर विभागातून शहर सौन्दर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ करीता भद्रावती शहराची निवड झाली असल्याची माहिती सुद्धा उपस्थितांना दिली सदर कार्याकामाचे सूत्र संचालन श्री रविंद्र गड्डमवार, कर व प्रसाकीय सेवा यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment