Ads

राहुल गांधींना घरातून बाहेर काढलं परंतु,भारतीयांच्या मनातून नाही : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांची वाढती प्रसिद्धी मोदी सरकारला खोचणारी ठरली. त्यासोबतच लोकसभेत मोदी व अदानी यांच्या मैत्रीचे पुरावे देत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळेच आकसापोटी मोदी सरकारने राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करून त्यांना बेघर केले. परंतु भारतीयांच्या मनातून राहुल गांधींचे स्थान मोदी सरकार कदापी काढू शकत नाही असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
Rahul Gandhi kicked out of the house but not from the minds of Indians: MP Balu Dhanorkar
आज चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अल्पसंख्याक, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तर्फे धरणे आंदोलन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजय नळे, ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी नेते उमाकांत धांडे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, महिला ग्रामीण काँग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीत अमृतकर, महिला शहर काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक नंदू नगरकर, विनोद अहिरकर,शहर अध्यक्ष तजुद्दिन शेख ,काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष शामकांत थेरे, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, अनुसूचित जाती महिला विभाग प्रदेश अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, गोविंद भेंडारकर, संदीप गड्डमवर, प्रफुल खापर्डे, प्रकाश पाटील मारकवार,दिवाकर निकुरे,जगदीश सेमले,ताहेर शेख,सय्यद मुकद्दर, प्रशांत भरती, सुलतान अली,आमिर शेख, कृणाल रामटेके, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, शफिक शेख, मतीन शेख, सुबस्टियन, जॉन,नसीम भाई, रिजवान शेख, शालिनी भगत, वंदना भागवत, नाहेदा ,बापू अन्सारी, विशाल नोमुलवार, सय्यद मॅडम, विनय बोधि, जाकिर भाई, यांची उपस्थिती होती.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी सांगितले कि, २०१४ पासून भारताची परिस्थिती हि बदलली आहे. भारताचे सामाजिक, राजकीय स्वास्थ बिघडलेलं आहे. लोकशाही हि धोक्यात आली आहे. हुकूमशाही राजवट निर्माण करण्याकडे मोदी सरकारच्या कौल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हि परिस्थिती बदलण्याकरिता सर्वानी एकत्र येऊन मोदी सरकारला मतातून सत्तापरिवर्तन करून धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment