Ads

चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी यांची पीक कर्ज भरण्याची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढविण्यात यावी : रवींद्र शिंदे

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांची पीक कर्ज भरण्याची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी घेवून वरोरा-भद्रावती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले आहे.
The deadline for farmers in Chandrapur district to pay crop loan should be extended till June 30, 2023: Ravindra Shinde
चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीककर्जे घेतली असून ती पीककर्जे भरण्याची अंतीम मुदत ही ३१ मार्च असते.

शेतकरी हा जगाचा पोशींदा अन्नदाता आहे. शेतकरी यांची आज सर्वात वाईट परिस्थती आहे. या पीक कर्ज हंगामात दोनदा अतिवृष्टी झाली व वारंवार निसर्ग त्यांच्यावर कोपत आहे. आता कुठे पीक हातात यायला लागले तर अचानक पावसाने कहर केला आणी पीकाचे नुकसान झालेले आहे. शेती ही शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे एकमेव साधन आहे. अनेक समस्यांना तो सामोरे जात असून घरी शेतीमाल पडलेला आहे.

या सर्व गोष्टीचा विचार करता तथा तत्कालीन राज्य सरकारने दोन वर्षाआधी ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्याची सवलत दिली होती. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या सध्या स्थीतीचा त्यांच्यावर होत असलेला निसर्गाचा मारा या सर्वाचा विचार करता यावेळी सुध्दा ३० जून २०२३ पर्यंत पीककर्ज भरण्याकरीता शेतकऱ्यांना सवलत लागू करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनात आहे.

सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, विधानसभा विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार, विधान परीषदचे विरोधीपक्ष नेता, अंबादासजी दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आदींना देण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment