Ads

अयोध्यातील राम मंदिरासाठी 31 वर्षे केला अनवाणी प्रवास

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख:-भद्रावती येथील रामभक्त चंद्रकांत गुंडावार या कार सेवकानी सहा डिसेंबर 1992 च्या कारसेवेत अयोध्येत राम मंदिरासाठी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार केला होता. तब्बल 31 वर्ष पर्यंत त्यांनी राम मंदिरासाठी अनवाणी प्रवास केला.
While felicitating Rambhakt Karsevak Chandrakant Gundawar, Min.Sudhir Mungantiwar and Sapna Mungantiwar
जोपर्यंत अयोध्येत भव्य राममंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा संकल्प होता . आता काही दिवसातच अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्णतः जाणार आहे. चंद्रकांत गुंडावार यांची इच्छाशक्ती व त्यागाची भावना यासाठी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चांदा क्लब मैदान चंद्रपूर येथे समिती तर्फे राज्याचे वन तथा सांस्कृतिक मंत्री तसेच पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रकांत गुंडावर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्कारात त्यांना कोल्हापुरी पादत्राणे, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी व्यासपीठावर रामायण मालिकेतील राम ,सीता व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे करून अरुण गोविल, दीपिका चिखलिया व सुनील लहरी तथा उत्तर प्रदेशातील मंत्री व प्रसिद्ध गायक कैलास खेर हे उपस्थित होते.

अयोध्येतील राम मंदिरासाठी बल्लारपूर येथील लाकूड निवडण्यात आले. काष्ठ पूजनाच्या निमित्ताने चंद्रपूर येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यापूर्वीच 25 डिसेंबर 2019 ला अयोध्येला जाऊन गुंडावार यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. आजही ते तिन्ही ऋतूंमध्ये खाजखळग्यांच्या रस्त्यावरून अनवाणी चालतात. इच्छाशक्ती व त्यागाची भावना असेल तर हे सगळं साध्य होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. एका मोठ्या सोहळ्यात चंद्रकांत गुंडावार या त्याग मूर्तीचा सत्कार करण्याचा शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता . आज तो शब्द त्यांनी पूर्ण केला. ना.सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय मोठ्या अशा कार्यक्रमात चंद्रकांत गुंडावार यांना कोल्हापुरी चप्पल देऊन त्यांचा सत्कार केला.

एका मोठ्या कार्यक्रमात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कोल्हापुरी चप्पल देऊन माझा सत्कार केला. कोल्हापुरी चप्पल परिधान करण्यासाठी दिली. मात्र मी अयोध्येत जाऊन राम मंदिराचे दर्शन घेऊनच ही चप्पल परिधान करणार असल्याचे चंद्रकांत गुंडावर यांनी सांगितले. तसेच या सर्व प्रवासात माझे कुटुंब माझ्या सोबत होते असेही त्यांनी सांगितले.
सत्कार करतेवेळी बळवंतदादा गुंडावार , अलका गुंडावार, नीता गुंडावार,अमित गुंडावार, धनश्री गुंडावार, प्रदीप गुंडावार व अन्य गुंडावार कुटुंबीय उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment