Ads

चार ते पाचजणांना जखमी करणारा बिबट अखेर जेरबंद

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :शहरालगतच्या आयुध निर्माण चांदा  ordnance Factory chanda येथील वसाहतीतील कम्युनिटी हॉल जवळील अय्यप्पा मंदिर मागील भागात वनविभागाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी लाऊन ठेवलेल्या पिंजऱ्यात दि.१ एप्रिलला पहाटे साडे सहा वाजताच्या सुमारास अखेर बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाला.The Leopard who rose to the people's lives is finally jailed
या घटनेची माहिती आयुध निर्मानी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता सदर बिबट्याला गंदा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यातआले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पिपरबोडी व आयुध निर्माणीच्या वसाहतीत धुमाकूळ घालून चार ते पाच जणांना जखमी केले होते.या घटनेची माहिती आयुध निर्मानी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता वनविभागाने आयुध निर्माण वसाहतीच्या अयप्पा मंदिर, हिरा हाऊस सह अन्य पाच परिसरात चार दिवसांपूर्वी अन्य तीन ठिकाणी त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते.या पिंजर्यात ठेवण्यात आलेले आमिष खाण्यासाठी आल्यानंतर तो पिंजर्यात अडकला.
सदर बिबट हा अंदाजे दिड वर्षाचा असून बिबट्याला सध्या वनविभागाच्या गंधा नाला नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती वनविभागातर्फे करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment