Ads

तब्बल तिन वर्षांनी थांबली भांदक स्थानकावर दक्षीण एक्सप्रेस.

भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी:-कोरोना कालावधीत शहरातील भांदक रेल्वस्थानकावर थांबणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते.याला तिन वर्ष पुर्ण झाले.अखेर खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने व पाठापुराव्याने तब्बल तिन वर्षानंतर दक्षीण एक्सप्रेस दिनांक 1एप्रील रोज शनिवारला सकाळी 7वाजुन 40मिनिटांनी भांदक रेल्वस्थानकावर थांबली. खासदार बाळू धानोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्थानकावर थांबलेल्या या एक्सप्रेसला तिच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
Dakshin Express stopped at Bhandak station after almost three years.
यावेळी खासदार धानोरकर यांनी येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अन्य एक्सप्रेस गाड्यांचे थांबेही त्वरीत पुर्ववत करण्याची मागणी केली.यावेळी खा. बाळू धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनील धानोरकर, इंटक नेते धनंजय गुंडावार, कांग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत काळे,शहर अध्यक्ष सुरज गावंडे,लक्ष्मण बोढाले,बाळू ऊपलंचीवार, संतोष आमने,सुधीर सातपुते, चंद्रकांत खारकर, प्रशांत झाडे,अजीत फाळके,विनयबोधी डोंगरे,सुयोग भोयर,बाळू चाफले,राकेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सिकंदराबाद वरुन दक्षीण एक्सप्रेसचे भांदक रेल्वे स्थानकात आगमन झाल्यानंतर गाडीचे चालक तथा अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळापूर्वी भांदक रेल्वे स्थानकावर दक्षीण एक्सप्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस, हिसार एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या थांबत होत्या. मात्र कोरोना कालावधीत येथे थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते.ते कोरोना कालावधी संपल्यानंतरही सुरु करण्यात आले नव्हते.त्यामुळे शहरातील रेल्वे प्रवाशांना त्रास सहण करावा लागत होता. हे थांबे पुर्ववत करण्यात यावे यासाठी शहरातील विवीध संघटनांतर्फे वेळोवेळी निवेदनेही सादर करण्यात आली होती. शेवटी बाळू धानोरकर यांनी यासाठी सततचा पाठापुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.दक्षीण एक्सप्रेस नंतर लवकरच टप्याटप्याने इतरही एक्सप्रेस गाड्यांचे थांबे येथे पुर्ववत करण्यात येणार आहे. दक्षीण एक्सप्रेसचा थांबा पुर्ववत झाल्याने शहरातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment