भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-एलबीएचएम चेस फेस्टिव्हल 2023 ,पुणे द्वारा राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूल उंदरी, पुणे येथे दिनांक 13 ते 17 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत भारतातील एकूण 463 नामांकित बुद्धीबळ पटूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत चंद्रपुर जिल्ह्यातील बुद्धीबळ क्रीडा प्रकारातील गौरव लिटल मास्टर संघर्ष अनिल आवळे ( वय 18 वर्ष ) यांनी राष्ट्रीय बुद्धीबळ चषक सह 50 हजार रुपये रोख रक्कम जिंकून 1300 गुणांकन गटातून तिसरे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत एकूण 09 राउंड खेळण्यात आलेले असुन अखेरच्या 9 व्या राऊंड मध्ये गुजरात च्या निविद राणा खेळाडू वर विजयश्री प्राप्त करीत 06 गुणासह मास्टर संघर्ष अनिल आवळे ही उल्लेखनीय यश प्राप्त केलेले आहे.
या स्पर्धेत मास्टर संघर्ष च्या अटॅक च्या चालीने अनेकांना आश्चर्य चकित व प्रभावित केलेले आहेत.
मास्टर संघर्ष हा चंद्रपुर जिल्ह्यातील नंबर वन चेस अकादमी - एस आर जे चेस अकादमी चे डायरेक्टर व अमेचुर बुद्धीबळ असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे सहसचिव श्री सुरज राजकुमार जयस्वाल सर यांच्या चेंस कोचिंग अकादमी चा सर्वात उत्कृष्ट स्टुडंन्ट्स आहे.
मास्टर संघर्ष अनिल आवळे यांनी आपल्या या जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रथमच यशाचे सर्व श्रेय आपले आई वडील व आपले गुरू ,कोच श्री सुरज राजकुमार जयस्वाल सर यांना दिलेले आहेत.
मास्टर संघर्ष अनिल आवळे यांच्या या ऐतिहासिक विजया करीता जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपुर माननीय श्री अविनाश पुंड सर, अमेचुर बुद्धीबळ असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष श्री पांडुरंग आंबटकर , कोषाध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराळे , उपाध्यक्ष श्री वाल्मिक खोब्रागडे , अमेचुर बुद्धीबळ असोसिएशनचे संस्थापक व सचिव श्री दुर्गराज एन रामटेके, जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री आशुतोष गयनेवर, एलन थिलक कराटे स्कूल चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष डॉ अंकुश आगलावे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चे अधिकारी श्री विनोंद ठिकरे , श्री विजय ढोबळे, श्री राजु वडते , श्री संदीप उईके , बंडू करमनकर ( राजुरा तालुका सचिव ),बंडू रामटेके ( भद्रावती तालुका सचिब ), अतुल कोल्हे , संदीप पंधरे ( कोरपना तालुका सचिव), सुनील गायकवाड ( वरोरा तालुका सचिव ), दीपक पाटील ( चिमुर तालुका सचिव ), डॉ संघपाल नारनवरे ( पोंभुरणा तालुका सचिव) करण डोंगरे ( बल्लारपूर तालुका सचिव) यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख बुद्धीबळ प्रेमींनी मास्टर संघर्ष च्य या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशासाठी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे .
0 comments:
Post a Comment