भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी: मागील काही दिवसांपासून वाढते तापमान लक्षात घेता, नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूनेRotary Club of Bhadrawati City भद्रावती शहरातील रोटरी क्लबतर्फे नागरिकांसाठी शहरातील ७ ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद तसेच सचिव अनिल धानोरकर यांच्या हस्ते या पाणपोईंचे उद्घाटन करण्यात आले.
उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना शुध्द व थंडगार पाणी मिळावे यासाठी रोटरी क्लबतर्फे शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत. भद्रावती शहरातील अली पेट्रोल पंप, डॉ. माला प्रेमचंद हॉस्पिटल, सक्सेस पॉईंट कंप्युटर, अमृत रेस्टॉरंट, जुना बस स्टॉप येथील आदित्य ट्रेडर्स, नगर परिषद, विजासन रोड येथील एपी रेस्टॉरन्ट या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच बाजारातील माता मंदिराजवळ वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुध्द व थंड पाणी मिळणार आहे.
यावेळी रोटरी क्लब भद्रावतीचे सुधीर पारधी, अब्बास अजानी, हनुमान घोटेकर, अविनाश सिद्धमशेट्टीवार, विक्रांत बिसेन, रुक्साना शेख, कीर्ती गोहने, कोमल नागोसे, वंदना धानोरकर, दिलीप राम, विनोद कामडी, विवेक अकोजवार, आनंद क्षीरसागर, युवराज धानोरकर, किशोर पत्तीवार, प्रकाश पिंपळकर, किशोर भोस्कर, गिरीश पवार यांची विशेष उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment