चंद्रपूर : राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द वगळण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही घोषणा राजकीय प्रेरीत असून, भामटा शब्द या जातीतून वगळल्या सवर्ण राजपूत विमुक्त जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेतील आणि या प्रवर्गात मोडणाऱ्या १४ विमुक्त जातींवर अन्याय होईल, त्यामुळे राजपूत भामटा जातीतून भामटा शब्द हटविण्यात येऊ नये, अशी मागणी बंजाराचे समाजाचे नेते रामराव चव्हाण, विश्वनाथ राठोड, प्रकाश राठोड, अशोक राठोड यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.Do not delete the word Bhamta from the Rajput Bhamta caste
संभाजीनगर येथे सकल राजपूत समाजाचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला समाजाला खूश करण्यासाठी राजपूत भामटा या जातीतून भामटा शब्द वगळण्याची घोषणा केली. विशेष राजपूत भामटा समाजाने अशी कोणतीही मागणी केली नसताना केवळ राजकीय हेतून अशी घोषणा करणे म्हणजे जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करीत आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, असा कोणताही निर्णय राज्यसरकारने घेऊ नये किंवा तसा प्रस्ताव केंद्रसरकारकडे पाठवू नये, अन्यया या निर्णयाविरोधात विमुक्त जाती प्रवर्गातील सर्वजातींना घेऊन राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
0 comments:
Post a Comment