Ads

भद्रावती नगर परिषद मुलींना बनवणार संरक्षणाच्यादृष्टीने आत्मनिर्भर

भद्रावती तालुका प्रतिनिधी :भद्रावती नगर परिषद मुलींना बनवणार संरक्षणाच्यादृष्टीने आत्मनिर्भर, मुलींवर होत असलेल्या अत्याचाराची वाढती संख्या लक्षात घेता, नगर परिषद भद्रावतीच्या महिला बाल कल्याण व डे.एन.यु.एल.एम. अंतर्गत मुलींना स्वतःच्या आत्मसंरक्षणाकरीता तायकांदो प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १७ मे २०२३ ला सायंकाळी ६.०० वाजता संपन्न झाला. Bhadravati Nagar Parishad will make girls self-reliant in terms of protection
 या कार्यक्रमांकरीता मा. श्री. अनिल धानोरकर, अध्यक्ष, न.प. भद्रावती हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. उद्घाटक म्हणून डॉ. माला प्रेमचंद उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विपीन इंगळे, पोलिस निरीक्षक, भद्रावती डॉ. विशाखा शेळकी, मुख्याधिकारी, न.प. भद्रावती सौ. सुनिता 
टिकले, महिला व बालकल्याण सभापती, न.प. भद्रावती, सौ. वंदना धानोरकर, सामाजिक कार्यकर्त्याश्री. प्रफुल चटकी, माजी उपाध्यक्ष व श्री. विनोद वानखेडे, बांधकाम सभापती हे उपस्थित होते..

हे प्रशिक्षण दिनांक १७ मे २०२३ ते १६ जून २०२३ पावेतो हुतात्मा स्मारक, भद्रावती येथे सायंकाळी ६.०० ते ७.०० वाजेपावेतो घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण कु. विद्या किन्नाके, जिल्हा नियंत्रक स्वयंसिध्दा व यांची संपुर्ण टिम यांच्या उपस्थितीत होत आहे..

या प्रशिक्षणाचा हेतू ऐवढाच आहे की, मुलींवर होत असलेले अत्याचार लक्षात घेता त्यांना स्वतःचे आत्मसंरक्षण करता यावे. तसेच मुलींनी स्वतःच्या संरक्षणाकरीता दुसऱ्यांवर विसंबून न राहता स्वयंभू बनावे. याकरीता हे प्रशिक्षण नगर परिषद तर्फे विनामुल्य आयोजीत करण्यांत आले असुन अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजीत करणारी भद्रावती नगर परिषद हि एकमेव नगर परिषद आहे. या प्रशिषणाकरीता सन २०२३ २०२४ या आर्थीक वर्षास ७० प्रशिक्षणार्थी मुलींची नोंद नगर परिषदेकडे झाली आहे.

या उद्घाटणीय कार्यक्रमाच्या प्रसंगी मा. अध्यक्ष, श्री.अनिलभाऊ धानोरकर यांनी संबोधित केले की, महिला व मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, मुलींनी स्वतःचे संरक्षण करण्याकरीता आम्ही हे प्रशिक्षण आयोजीत केले. तसेच आम्ही म्हैसूर येथे प्रशिक्षणाकरीता गेले असता, तिथे सांगण्यांत आले की, नगर परिषद कायदा व सुव्यस्था वगळता इतर सर्वच सुविधा पुरविते. तेव्हाच आम्ही विचार केला की, कायदा व सुव्यवस्थेची जरी व्यवस्था नाही करु शकलो तर काय झाले, यावर आळा घालण्याकरीता प्रशिक्षण तर आयोजीत करु शकतो, हि संकल्पना समोर ठेवून हे प्रशिक्षण आयोजीत केल्याचे संबोधीत केले.

मा.श्री. बिपीन इंगळे, पोलिस निरीक्षक, भद्रावती, यांनी संबोधीत केले की, आजही महिला स्वत:ची बदनामी होते म्हणून स्वतः अन्याय सहन करते पण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देत नाही. अशा महिलांना त्यानी बदनामींची भिती न बाळगता कसल्याही प्रकारचा अन्याय होत असल्यास थेट पोलिस स्टेशनला तक्रार करावी. तसेच नगर परिषद तर्फे मुलींना संरक्षणाच्या दृष्टीने आत्मनिर्भर करुन एकप्रकारे पोलिसांना मदतच करीत आहे. असे संबोधीले.

यानंतर मा. डॉ. माला प्रेमचंद यांनी तायकांदो या प्रशिक्षणाचे महत्व काय आहेत याबाबतची माहिती उपस्थितांना व प्रशिक्षणायांना दिली. तसेच तायकांदो हा आलम्पीक दर्जाचा खेळ असल्याचे संबोधिले.

शेवटी मा. डॉ. विशाखा शेळकी, मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले. व हा कार्यक्रम शेवटच्या दोन दिवसांत कसा यशस्वी झाला याचे महत्व उपस्थितांना पटवून दिले.

या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती ज्योती लालसरे यांनी केले असुन, हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्रीमती. ज्योती लालसरे, कु. पुजा पारखी, व नगर परिषदेच्या इतर कर्मचारी यांनी मौलाचे परिश्रम घेतले...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment