भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख:तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनलमुळे शाळेच्या इमारतीस आग लागून शाळेतील संपूर्ण वीज उपकरणासह इतर महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक 17 मे ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.CMPDI's solar power panel causes fire in school building
सीएमपीडीआय वरोरा द्वारा दिनांक 17 मे ला तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सौर ऊर्जा पॅनल बसविले होते. त्यामुळे अचानक बिघाड होऊन शाळेच्या इमारतीस सकाळी 9 वाजता आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असून शाळेतील संपूर्ण विद्युत उपकरणासह इतर साहित्य जळून खाक होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची तक्रार शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह ग्राम पंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी तहसीलदार भद्रावती, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती, यांचे सह पोलिसात केली. या घटनेची चौकशी करून नुकसान भरपाईची मागणी ग्रामपंचायत सरपंच पानवडाळाचे महाकुलकर यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
0 comments:
Post a Comment