भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख :दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात शहरातील फेरीलँड शाळेला घवघवीत यश मिळाले आहे. शाळेचे नऊ विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यावर्षी सुद्धा फेरलैंड शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ता प्राप्त केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये सात मुलींचा तर दोन मुलांचा समावेश आहे. या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे.
Fairyland School Success in 10th CBSC Exam.
गुणवत्ता प्राप्त केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यात गौरी शर्मा 93.80टक्के,मुस्कान रामटेके 96.40टक्के ,इशा कटरे 91.20टक्के, स्नेहिता घडले 90.80टक्के, संजाली दोहतरे 90.20टक्के, आरोही ठाकरे 87.60टक्के, सूर्यनारायण कुमार 83टक्के, तानिशा पोटे81टक्के व यश बोढाले 80.20टक्के या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीत यश प्राप्त केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक एडवोकेट युवराज धानोरकर व प्राचार्य वर्षा धानोरकर यांनी अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिलेल्या आहेत.
0 comments:
Post a Comment