Ads

वऱ्हाडाची खासगी बस नाल्यात कोसळली

विसापूर : मूल तालुक्यातील नांदगाव घोसरी येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन खासगी बस राजुरा तालुक्यात लग्न कार्याला गेले होते. गावाकडे परतीचा प्रवास करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.५० च्या आसपास असलेली खासगी बस नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले.One woman died and 23 people were injuredही घटना बल्लारपूर तालुक्यातील किन्ही नाल्यावर शुक्रवारी रात्री १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे नांदगाव घोसरी गावात शोककळा पसरली आहे.या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Groom's private bus fell into the drain
या भीषण अपघातात सुनंदा हरिदास मडावी ( वय -५०) रा. नांदगाव घोसरी ता. मूल हिचा मृत्यू झाला. तर अन्य २३ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये समीर संतोष बावणे ( २५) रा. चिमडा ता. मूल, दामोदर हजारे ( ४६), कविता चलाक (४५), मीराबाई कामटकर (६३) हे गंभीर असून त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य १६ जणांना प्रथोमपचार करून सुट्टी देण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील चालक स्नेहल मडावी याने ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच.३४-एबी -८०७५ ने वऱ्हाडी घेण्यासाठी नांदगाव घोसरी येथे गेला. त्याने लग्नातील वऱ्हाडी राजुरा तालुक्यातील लग्न कार्याला सुखरूप नेले. मात्र राजुरा कडून नांदगाव घोसरी गावाकडे वऱ्हाडी घेऊन जात असताना येनबोडी पासून २ किलोमीटर अंतरावर वाहन गेले. त्यावेळी नाल्याजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वऱ्हाडी असलेली खासगी बस नाल्यात कोसळली. यावेळी वऱ्हाड्यानी एकच हाहाकार केला. रात्रीची वेळ असल्याने बचाव कार्य करताना पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागला. यामध्ये सुनंदा मडावी या महिलेला प्राणास मुकावे लागले.
बल्लारपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे व कोठारी येथील पोलीस दलाने रात्री तीन ते चार तास बचाव कार्य करून जखमी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. रिना मंगेश नैताम रा. नांदगाव घोसरी हिच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment