चंद्रपुर:गरिब गरजु विद्यार्थांना सर्व सोयी सुविधा असलेल्या अभ्यासिकांमध्ये निशुल्क अभ्यास करता यावा यासाठी मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प आपण केला होता. या संकल्पपुर्तीकडे यशस्वी वाटचाल होत असल्याचा आनंद आहे. आज नगिनाबाग वार्डातील चोखामेळा वस्तीगृह येथील अभ्यासिकेचा भुमिपुजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. येथे तयार होत असलेली अभ्यासिका या भागातील विद्यार्थांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
50 लक्ष रुपयांच्या निधीतुन नगीनाबाग येथे तयार होणार असलेल्या अभ्यासिकेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन संपन्न झाले. सदर भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाबोधी पुनवटकर, मोरेश्वर चंदनखेडे, एम. डी पिंपडे, अविनाश टिपले, विलास कुमार दुर्गे, सुजाता नळे, नंदा नगकर, दमयंती हस्तक, अॅड. खंडारे, सुभाष खाडे, राजु पेटकर, राजेश नंदेश्वर, पि. व्ही दखनकर, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन आदींची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले. चंद्रपूर मतदार संघात विविध विकासकामे होत आहे. हे विकास कामे होत असतांना आपण शिक्षण क्षेत्रातही भरीव काम करण्याचा संकल्प केला आहे. मध्यवर्गीय कुटंुबातील मुल शिकत असलेल्या शालेय संस्थाना संगणक, लॅब आपण उपलब्ध करुन देत आहोत. तर विद्यार्थांसाठी मतदार संघात 11 अभ्यासिका आपण तयार करत आहोत. यातील पवित्र दिक्षाभुमी येथील 1 लाख पुस्ताकांची क्षमता असलेल्या अभ्यासिकेचे काम सुरु झाले आहे. तर मतदार संघातील इतर 6 ठिकाणच्या अभ्यासिकांचे भुमिपूजन संपन्न झाले आहे. यातील दोन अभ्यासिकांचे काम अंतिम टप्यात असल्याचे यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले.
चंद्रपूर मतदार संघाच्या विकासकामासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून शहरी आणि ग्रामीण भागात विकासकार्य केल्या जात आहे. या विकास कामात मतदार संघात तयार होत असलेल्या 11 अभ्यासिकांचाही समावेश आहे. महागड्या खाजगी अभ्यासिकांमध्ये प्रवेश न घेवू शकणा-या विद्यार्थांना या अभ्यासिकांमध्ये निशुल्क अभ्यास करता येणार असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment