Ads

जिल्ह्यातील सात स्काऊट गाईड शिक्षकांची पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवड

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख - चंद्रपूर जिल्ह्यातील सात स्काऊट गाईड शिक्षकानी नुकतेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर जिल्हा पुणे येथे आठ दिवस निवासी शिबिराला उपस्थित राहून आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. Seven scout guide teachers of the district selected for training at Pune
ऑक्टोबर 2022 मध्ये प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी पैकी जिल्ह्यातून सहा शिक्षकांची प्रगत प्रशिक्षनासाठी निवड करण्यात आली तर एका शिक्षकाची प्राथमिक प्रशिक्षण साठी निवड करण्यात आली.
यामध्ये स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षणास शिवाजी हायस्कूल माथा ता. कोरपना येथील सुधाकर पेंदोर, स्काऊट मास्टर प्रगत प्रशिक्षणास कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड ता.नागभीड येथील स्काऊट मास्तर श्री.किशोर नीलकंठ नरुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा ता.भद्रावती येथील श्री.एस.एच. मानकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पल्लेझरी ता. जिवती येथील उमाजी यादवराव कोडापे, प्रशांत विद्यालय किटाडी तालुका नागभीड येथील प्रशांत जनार्धन गावंडे, भवानजीभाई हायस्कूल चंद्रपूर येथील महेश नथुजी बावणे,संकेत जयकर सहभागी झाले होते.
सहभागी स्काऊट शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. प्रशिक्षण स्थळी घेतलेले अनुभव व केलेली कृती याचा फायदा जिल्ह्यातील विविध विद्यालयातील स्काउटर विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील स्काउट चळवळीला वेग यावा,स्काऊटर विद्यार्थ्यांना विविध उपक्रमामध्ये व स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे यासाठी सदर प्रशिक्षण अतिशय महत्वाचे मानले जाते म्हणुनच जिल्हा संघटक श्री.चंद्रकांत भगत यांनी वारंवार शिक्षकांना प्रोत्साहीत केले.
रामबाग भोर (पुणे) येथील प्रशिक्षण शिबीर प्रमुख श्री रविंद्र बचाव सर मार्गदर्शक स्काऊट मास्तर श्री विकास लोखंडे सर ,श्री दिलीप नेवसे सर ,श्री जॉन स्वामी सर ,श्री सुरेंद्र शिंदे सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास,शाळेत युनिट सुरू करणे,विविध गॅझेट तयार करणे,गाठी बांधणे,शालेय शिस्त,जांबोरी इत्यादी सराव करवून घेतले. जिल्हा स्काऊट आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ). मा.दीपेंद्र लोखंडे साहेब,जिल्हा स्काऊट गाईड प्रमुख मा.चंद्रकांत भगत,जिल्हा शिबिर प्रमुख किशोर उईके यांनी अभिनंदन केले.
[5/26, 11:45 AM] Javed Sheikh Bhadravati: बारावीच्या निकालात शिंदे महाविद्यालय अव्वल...
उत्तम निकालाची परंपरा कायम...

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चा निकाल उत्तम लागला असून , उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावीच्या निकालात शिंदे महाविद्यालय तालुक्यातून अव्वल आहे.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चा विज्ञान शाखेतील विद्यार्थी पियुष विलास राजूरकर याने ९२.८३% गुण घेतले असून तो विज्ञान शाखेत तालुक्यातून प्रथम आला आहे. तसेच महाविद्यालयातून सुद्धा प्रथम क्रमांकावर आहे. कु. गुंजन राजकुमार लुनावत या विद्यार्थिनीने ९२.५९% गुण प्राप्त करत तालुक्यातून द्वितीय स्थानावर आहे व महाविद्यालयातून सुद्धा दुसऱ्या स्थानी आहे. कु. वैष्णवी माधव केंद्रे ह्या विद्यार्थिनीने ८६.८३% गुण प्राप्त करत महाविद्यालयातून तिसरे स्थान पटकावले आहे. कु. प्रांजली नारायण बजारे हिने ८५% , कु. ऋतुजा अमितकुमार मोडक हिने ८४.५०% , कु रक्षा देवराव उराडे हिने ८०.५० % तर अथर्व उमेश वैरागडे यांनी ८०.१७ % गुण घेतले असून या विद्यार्थ्यांनी नैपुन्य प्राप्त केलेले आहे. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७ टक्के लागलेला असून सात विद्यार्थ्यांनी ८०% च्या वर गुण प्राप्त केलेले आहेत.
या महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल सुद्धा उत्तम लागला आहे. कु. हिमांशी माधव चतारे हिने ७१.६७ % गुण घेतले असून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. मयुरी दिलीप ठमके हिने ७१.३३ % गुण प्राप्त केले असून ती महाविद्यालयातून दुसऱ्या स्थानावर आहे. कु. वैष्णवी अरविंद भोयर हिने ७०.३३% गुण घेतले असून ती महाविद्यालयातून तिसऱ्या स्थानावर आहे.

यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य विभागाचा निकाल हा ९२.३० % लागला आहे. वाणिज्य विभागात कु. झोया परवीन सय्यद हिने ८४.५०% गुण घेतले असून तालुक्यातून प्रथम व महाविद्यालयातूनही प्रथम क्रमांकावर आली आहे . कु प्रेरणा अनिल घाटे हिने ८१.५० % गुण प्राप्त करत तालुक्यातून द्वितीय व महाविद्यालयातून सुद्धा द्वितीय स्थानावर आहे. तर कु. रेवती सुधाकर घाटे या विद्यार्थिनीने ७८.३३% गुण घेत तालुक्यातून तिसऱ्या स्थानावर व महाविद्यालयातून तिसऱ्या स्थानावर आहे . कु. वैष्णवी मोरेश्वर तराळे हिने ७७.५० % गुण घेत तालुक्यातून चौथी व महाविद्यालयातून चौथ्या स्थानावर आलेली आहे.

एम सी व्हि सी विभागाचा निकाल हा सुद्धा उत्तम लागलेला असून कुमारी साक्षी मत्ते हिने ७१.१७ % गुण घेतले असून महाविद्यालयातून प्रथम आली. कु. रूपाली खामकर हिने ६५.६७% गुण घेतले असून ती द्वितीय स्थानावर आली तर कु. समीक्षा आवटे हीने पण ६५.५०% गुण घेत महाविद्यालयातून तिसऱ्या स्थानावर आली आहे.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमीच बोर्ड परीक्षेत तसेच क्रीडा क्षेत्रात सुद्धा अव्वल असतात. ही गुणवंत परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राध्यापक डॉ. सुधीर मोते, ज्ञानेश हटवार, नरेश जांभुळकर, सौ.ऊज्वला वानखडे,भीष्माचार्य बोरकुटे , हरिहर मोहरकर , शेखर जुमडे व समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment