Ads

सिध्देश्वर मंदिरासाठी 14 कोटी 93 लक्ष निधीची प्रशासकीय मान्यते सह निधी मंजूर.

राजूरा :राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देवाडा परिसरातील जागृत श्री. सिध्देश्वर भगवान महादेवाच्या मंदिराचे जतन व दुरुस्ती व पुनर्बांधणी साठी 14 कोटी 93 लक्ष 99 हजार 753 रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक: स्मारक-2022/ प्र. क्र.108/ सा. का. 3, दि. 13 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे या मंदिर परिसराचा जीर्णोद्धार होणार आहे.
14 Crore 93 Lakh funds approved with administrative approval for Siddheshwar Temple.
महाराष्ट्र–तेलंगणा सीमावर्ती भागातील राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर देवाडा परिसरात 12 व्या ते 13 व्या शतकातील श्री. सिध्देश्वर पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदीर असून या परिसरात 12 लहान मोठ्या आकाराची ज्योतिर्लिंग मंदिरे होती. त्यापैकी फक्त एक मंदिर अस्तित्वात आहे. सिध्देश्वर मंदीर परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी परिसरातील जनतेच्या मागणीनुसार व त्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आग्रही मागणी केली व पाठपुराव्याची जबाबदारी स्विकारून सातत्याने पाठपुरावा केला. निमकर यांच्या विनंती नुसार 14 सप्टेंबर 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे ना. मुनगंटीवार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा व वरीष्ठ अधिकार्‍यां सोबत बैठक आयोजित केली होती. याच बैठकीत महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक यांना सिद्धेश्वर मंदिराला प्रत्यक्ष भेट देण्याचे, तसेच त्यासंबंधित कामाचा विस्तृत आराखडा आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर चे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण कामाकरिता 49 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात करावयाच्या कामाकरिता 14 कोटी 93 लक्ष निधीची प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी देण्यात आली आहे.

श्रावण महिन्यात व शिवरात्रीला या मंदिरात उत्सव साजरा केला जातो व यात महाराष्ट्रातील तसेच नजीकच्या तेलंगणातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनाला येतात. डोंगराच्या पायथ्याशी व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदीर परिसराचा कायापालट होणे आवश्यक होते. त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष देऊन निधीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानुसार आता या देवाडा परिसरातील पुरातन सिध्देश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. या निमित्ताने या मंदिर परिसरात एक उत्तम असे पर्यटन स्थळ निर्माण होणार आहे. ना. मुनगंटीवार यांनी वचनपूर्ती केल्याबद्दल भगवान महादेवाचे भक्तगण व परिसरातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment