राजुरा :राजुरा येथील नामांकित साई अभ्यासिकेमधे नियमित सभासद असलेल्या डाॅ. लीना मारोती धांडे यांची एम. बी. बी. एस. पदवी पूर्ण झाल्यावर वैद्यकीय अधिकारी (M.O.) म्हणून बल्लारपूर रुग्णालयात नियुक्ती झाल्याप्रसंगी त्यांचे विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला. Best choice of Sai study to achieve goals.- Rajni Sharma
तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या निकालात कु. गझल शेख, कु. वेदान्ती गर्गेलवार कु. अनुष्का कुडे या तीघांनी उत्कृष्ट गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्यासोबतच सुजा खोब्रागडे या कॉम्युनिटी हेल्थ नर्सिंग ऑफिसर परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून आठव्या क्रमांकाचे यश प्राप्त केल्याबद्दल साई अभ्यासिका (स्टडी सेंटर) , राजुरा द्वारे विद्यार्थ्यांना भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. रजनी शर्मा ,चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा, नेफडो च्या राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती राजुरा, सत्कारमूर्ती तथा प्रमुख अतिथी डॉ. लीना धांडे,वैद्यकीय अधिकारी, बल्लारपूर, श्रीमती सुलोचना रोहणे , मार्गदर्शिका, साई स्टडी सेंटर, राजुरा उपस्थित होते. याच वेळेस मान्यवर प्रमुख पाहुण्याणी या अभ्यासिकेच्या विकासासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन देत साई अभ्यासिका व येथील अभ्यासाला अनुरूप व शिस्तबद्ध आणि शांत वातावरण विद्यार्थ्यांचा अभ्यासात नियमितपणा आणण्यासाठी पुरक ठरत आहे तसेच ध्येय गाठण्यासाठी साई अभ्यासिकेचा ऊत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन रजनी शर्मा यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून बादल बेले यांनी ही अभ्यासिका अल्पवधितच आदर्श व आकर्षक केंद्र बनले आहे असे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सागर यांनी केले तर प्रस्ताविक उमेश लढी यांनी तर आभार राहुल शेंडे यांनी मानले. याप्रसंगी विध्यार्थ्यांनी स्वतःचे मत व्यक्त केले. सध्या सुद्धा भरपूर विध्यार्धी जोमाने अभ्यास करत आहेत व साई अभ्यासिकेच्या सोईसुविधांचा लाभ घेत आहे. यांच्या यशाबद्दल साई अभ्यासिकेचे संचालक, व्यवस्थापक तसेच मार्गदर्शक यांनी कौतुक केले व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विध्यार्थी, पालक व नियमित अभ्यास करणारे यांची मोठयाप्रमाणात उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment