Ads

रामाळा तलावातील इकॉर्निया काढण्याची मागणी

चंद्रपूर : रामाळा तलाव संवर्धनाकरीता जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. मच्छिनालावर टाकण्यात आलेला बांध मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे फुटून इकॉर्निया वनस्पतीसह तलावात वाहुन आले. त्यामुळे ही ईकॉर्निया त्वरीत काढुन टाकण्याची मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल यांच्याकडे केली.Demand to remove icornia from Ramala lake
सांडपाणी प्रक्रीया करणारे एसटीपी बांधकामाकरीता लागणारा वेळ लक्षात घेता त्यापुर्वी ही वनस्पतीवर नियंत्रण मिळविण्याकरिता जैविक उपाययोजना करण्याची मागणी निवदेनातून करण्यात आली आहे.
Request for 'Biological' Control of STP Construction Hoist
रामाळा तलाव संवर्धनाचे कार्य जिल्हा प्रशासनातर्फे केले जात आहे. यादरम्यान मागील वर्षी रामाळा तलाव खोलीकरणाचे काम पुर्ण झाले असुन यंदा तलावाचे पाणी फुट ब्रिजचे बांधकामाकरीता सोडण्यात आले होते. सोबतच मच्छीनाला वळती करून पाणी तलावात येण्याचे थांबविण्याकरीता बांध टाकण्यात आले. यादरम्यान तलाव कोरडा होण्यापुर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे मच्छीनाला बांध फुटल्याने आलेल्या पाण्यासोबत काही प्रमाणात इकॉर्निया वनस्पती वाहुन आलेली दिसुन येत आहे. येत्या महीन्यात यावर नियंत्रण न मिळविल्यास जलपर्णीची वाढ मोठया प्रमाणात होईल. तलावात येणारे सांडपाणी यावर एकमात्र उपाय म्हणुन दोन ठिकाणी एसटीपी बांधकाम आवश्यक असुन यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मागील महीन्यात यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुध्दा पार पडली होती.

चंद्रपूर शहरातिल एकमात्र आणि ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन फेब-मार्च 2021 दरम्यान केलेले होते. यांनतर शासन-प्रशासन पातळीवर रामाळा तलाव संवर्धनाच्या कामास गती देण्यात आलेली होती. तलावाचे खोलिकरण झाल्यानंतर, मध्यतरी अन्य आवश्यक प्रस्ताव, आराखडे व निधीची पुर्तता याची गती मंदावली असल्याने त्यास गती देण्याची गरज आहे.

तलावाचे खोलीकरण:
तलावाचे खोलीकरण पुर्ण झाले असले तर तलावात येणारे सांडपाणी व उर्वरीत तलाव संवर्धनाच्या कामास गती प्रदान करणे गरजेचे आहे.

रामाळा उदयान कडे जाणारा फुट ब्रिज:
चंद्रपूर शहराच्या दुष्टीने मध्यभागी असलेला आणी शहराच्या सौदर्यात भर टाकणारा एकमात्र ऐतिहासिक रामाळा तलाव याकडे अधिक लक्ष दिल्यास शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षीत करेल. यासाठी वस्तिच्या बाजूने 'फुट ब्रिज' रामाळा तलावात उदयानात जाण्यासाठी आवश्यक असलेला पुल, सदर पुलाचे बांधकामास मंजुरी मिळाली असुन, सदर बांधकामा करीता पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असुन त्याकरीता प्रयत्न होणे गरजेचे आहे. सोबतच रामाळा उदयानाचा विकास सुध्दा आवश्यक आहे.

तलावात येणारे सांडपाणी प्रकीया करणारे संयत्र उभारण्याचे कामः
एसटीपी - तलावात येणारे सांडपाणी जे मच्छिनाला व जलनगर मधुन तलावात येतात यावर सांडपाणी प्रकीया करणारे संयत्र उभारणे, यासाठी जिल्हा खनिज विकास निधीमधुन त्वरित मंजुरी प्रदान करण्यात यावी आणि बांधकाम सुरुवात करावी.

इकॉर्निया वनस्पती निर्मुलन:
तलावात वाढणारी जलपर्णी इकॉर्निया याचे प्रमुख कारण तलावात येणारे सांडपाणी असुन यावर उपाय कायमस्वरूपी उपाय करीता सांडपाणी प्रकीया संयत्र एसटीपी उभारण्याची प्रकीया सुरू आहे मात्र तोपर्यत तलावात जलपर्णी "जैवीक" "organic" पध्दतीने नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाउ शकतात. इकॉर्निया खाणारे इकॉर्निया निओचिटीना किंवा सिंटोबैगस साल्विनीया नावाचे किटक नैसर्गिकरित्या नष्ट करतात. त्याचा प्रयोग महानगरपालीका कडुन करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
तलावातील मासेमारी मुळे रोजगार:
रामाळा तलावात मासेमारी करणारे बांधव यांचा रोजगार यावर असल्याने त्यादृष्टीने सुध्दा कार्य करण्याची गरज आहे. यंदा पावसाळयात बिजाई सोडण्याच्या दृष्टीने आणि आवश्यक विकास कामे करण्याच्या दृष्टीने व्यापक नियोजन आखणे सुध्दा आवश्यक आहे. तलाव स्वच्छ व शुध्द पाणी असल्यास तलावातील मासेमारी मुळे यावर त्याचे रोजगारात वाढ होउ शकते
पुरातत्व विभागाकडुन तलावाची व किल्ल्याची तुटलेली भिंत दुरस्ती आवश्यक
रामाळा तलावाच्या दक्षिण पुर्व दिशेस असलेली किल्ला परकोटाची भिंत दोन ठिकाणी तुटलेली असुन त्याची दुरस्ती करण्याची मागणी भारतीय पुरातत्व विभागाकडे करण्यात आलेली असुन अदयाप यावर कार्यवाही झालेली नाही. खोलिकरण नंतर तलावातील पाणी साठा वाढला असून, तुटलेल्या पाणी वाहुन जाउन धोका होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडुन सुध्दा दखल घेण्याची गरज आहे.Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment