Ads

दहेगाव, येजगावं, येरगावं भेजगावं घाट अवैध रेती तस्करांसाठी वरदान

सुशी दाबगावं प्रतिनिधी : मुल तालुक्यातील सुशी दाबगाव, दहेगाव,नलेश्वर,येजगाव,भेजगाव या रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे.अंधारी व उमा नदी पात्रातील वैद्य घाटाऐवजी रेती चोरट्यांनी अवैध घाट तयार करून प्रशासनाची फसवणूक करीत असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. रेती माफियांनी नदि पात्रातच पर्यावरणाच्या मार्गदर्शक तत्वाला बाजूला सारत मुरूम टाकून तीन किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करून पोकल्यान मशिनद्वारे अवैधरित्या रेतीचा उपसा करीत आहेत.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचा काना डोळा होतांना दिसत आहे.नेमकं प्रशासनाचे दुर्लक्ष का होतो हा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पळला आहे. रेती तस्करांच्या मुजोऱ्या‌ वाढण्यामागचे मुख्य कारण अर्थ कारण तर नसावं अशी खंमंग चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.Dahegaon, Yejgaon, Yergaon Vezhgaon ghat boon for illegal sand smugglers
मुल तालुक्यातील सुशी दाबगावं, नलेश्र्वर, उथळपेठ, दहेगाव, येजगाव, भेजगाव, सिंतळा, येरगाव परिसरात गेल्या अनेक महिनाभरापासून घाट सोडून दुसऱ्या सर्वे नंबर मधून अवैधरीत्या पोकलॅन मशिनद्वारे रेती उत्खनन व तस्करी करण्यात येत आहे.रात्रीच्या वेळी अवैध व ओवर लोड हायवा ट्रकने बिन दिक्कत गावातील मुख्य रस्त्याने सुशी दाबगावं मार्गे चंद्रपूर, बलारपुर सारख्या आदी शहरासह जवळपासच्या अनेक गावांमध्ये ही अवैध रेती वाहतूक व विक्री केली जात आहे.

या अवैध रेती तस्करी प्रकारात काही बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलल्या जात असल्याने दाद कोण देणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अर्थात वाळूतस्करीचा हा व्यवसाय वरिष्ठ मोठ्या अधिकारी वर्गाला हाताशी धरून केला जात असल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न नागरिकांना आज निर्माण झालं आहे.
अंधारी व उमा नदी या मुल तालुक्यातील प्रमुख नदी आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या नदीला महापूर आलं होत.त्यामुळे रेतीचा साठाही बऱ्याच प्रमाणात जमा झालेला होता.नदीचा प्रवाह थांबता क्षणी घाट लिलाव झाले.मात्र रेती घाट घेणाऱ्यांनी नदि घाटातील रेती उत्खननाची प्रस्तावित जागेचा मोजमाप सुद्धा होऊ न देता.वैद्य व अवैध रेती घाटातून अवैध रित्या पोकलॅन मशीनचा नदीमध्ये वापर करून मोठ्या प्रमाणात रेती उपसा चालू आहे. ऐवढेच नाही तर उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने पाण्यासाठी आधीच हाहाकार असताना रेती तस्करांकडून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळूनच मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन केल्याने पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर कारवाईचे पावलं उचलली जाणार नाही. तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सदर रेती तस्करीचा प्रकार हा गेल्या वर्षभरापासून चालू असून काहीच कार्यवाही होत नसल्याने नेमका पाणी मुरत कुठे आहे हे स्वतः सन्माननीय जिल्हाधिकारी यांनीच शोधणे गरजेचे झाले आहे.
अंधारी व उमा नदीच्या पाण्याचा प्रवाह मोडून व नदि पात्रात मुरूम टाकून रोड तयार करून तीन किलोमीटर नदि पोखरून व पर्यावरणाचे संतुलन बिघडवून रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर कार्यवाही करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
--------------------
"अंधारी व उमा नदि येथून होत असलेली रेती तस्करी हि पर्यावरणाला हानी पोहचवणारी आहे.प्रस्तावित रेतीघाटाव्यतीरिक्त होणारी इतरेतरची रेती उत्खनन व नदीतून मुरूम टाकून रस्ते बनवून मोठ्या प्रमाणात पोकलॅनद्वारे रेतीचा होत असलेला उपसा हे पर्यावरणाचे संतुलन बिघडवणारे आहे.संबंधीत गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित रेती घाटाची चौकशी करून कार्यवाही करावी."
-बालाजी मेश्राम,
पर्यावरण प्रेमी
नलेश्वर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकी लगत रेती तस्करांनी रेतीचे अवैध उत्खनन करीत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे.पिण्याच्या पाण्याचा गावकऱ्यांना मोठा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने तात्काळ रेती तस्करांवर कार्यवाही करावी.
-प्रदीप तावाडे सामाजिक कार्यकर्ता नलेश्र्वर
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment