Ads

जागतिक पर्यावरण दिन निमित्त स्वच्छता अभियान संपन्न.

राजुरा 5 जून :राजुरा शहरालगतच जोगापूरचे कक्ष क्रमांक 165 येथे घनदाट व सुंदर जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वण्यप्राण्यांचे वास्तव्य सुद्धा आहे. परंतू या जंगल परिसरात राजुरा शहरातील प्लॉस्टीकयुक्त कचरा, शिळे अन्न मोठ्या प्रमाणात फेकल्या जात असल्याने येथील वण्यप्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता तसेच वन्यप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले होते.
राजुरा-आसिफाबाद या राज्यमार्गावर शहरापासून अवघ्या 2 किमी अंतरापासून जंगल सुरू होते. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रोई, निलगाल, राणटी कुत्री, सांबर, चितळ, मोर, जंगली डुकरे यासह विविध वण्यप्राणी वास्तव्यास आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे व निसर्गरम्य वातावरणामुळे वन विभागाने या ठिकाणी जंगल सफारी सुद्धा सुरू केली आहे . मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी या जंगलातील वन्यप्राण्यांच्या दर्शनाचा लाभ सुद्धा घेतला. परंतू जोगापूर जंगलाच्या प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला राज्यमार्गालगत शहरातील प्लॉस्टीकयुक्त कचरा त्यात कॅटरींग व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या प्लॉस्टीकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लास, सह शिळे अन्न सुद्धा फेकले गेले असल्याने वन्यप्राणी या शिळ्या अन्नाच्या वासामुळे याठिकाणी येऊन अन्नासोबतच प्लॉस्टीक खात असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. अनेकदा वाहणांच्या धडकेत वन्यप्रान्याचे अपघात होऊन ठार झालेले आहे. त्यामुळे हा कचरा वण्यप्राण्यांच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत होता. जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्ताने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या मार्गदर्शनातून स्वच्छता अभियानाचे आवाहन केले. या स्वच्छता अभियानात मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र राजुराचे एस. डी. येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पुढाकार घेतला. क्षेत्र सहाय्यक एन. के. देशकर, विहीरगाव, एस. एम. संगमवार, टेंबुरवाही, पी. आर. मत्ते, राजुरा, वनरक्षक एस. व्ही. गज्जलवार, रामपूर, एम. ए. चाफले, चुनाळा, एम. एन. राठोड, सुमठाना, व्ही. सी. वाघ, शिर्शी, ए. एन. पोले, तुलाना, एस. डी. सुरवसे, विहीरगाव, एस. आर. हाके, मूर्ती, डी. एस. जाधव, चणाखा, सामाजिक वनिकरण परिक्षेत्र राजुरा चे वनपाल तथा नेफडो च्या वन्यजीव संवर्धन समिती चे नागपूर विभाग अध्यक्ष विलास कुंदोजवार, नगर परिषद राजुरा चे प्रशासकीय अधिकारी तथा नेफडो चे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर,राजश्री उपगन्लावार, स्वरूपा झंवर, रजनी शर्मा, कविता शर्मा, संदीप आदे, उमेश लढी, जयवर्धन खोब्रागडे, किशोर वरवाडे, एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन चे संचालक नितीन मुसळे, आदर्श हायस्कुल चे कुणाल रागीट, जय गिरासावळे यांच्यासह हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनिकरण, नगर परिषद राजुरा, आदर्श हायस्कुल शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभागाचे विध्यार्थी आदींनी अथक परिश्रम घेतले.
राजुरा शहरातील जनतेला, छोटे-मोठे व्यापारी, कॅटर्स, चिकन सेंटर, सलून व्यवसायिक यांना आवाहन करण्यात येते की कृपया त्यांनी शहरालगत राजुरा - आसिफाबाद रोड शेजारील जोगापूर जंगल परिसरात कोणत्याही प्रकारचा, शिळे अन्न, प्लास्टिक कचरा टाकू नये. तसेच आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यास तसेच वनपर्यटन, वन्यप्राणी संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले, यापुढे असा कचरा टाकताना आढळल्यास दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल असे सुरेश येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.
        सुरेश . डी. येलकेवाड,
वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग राजुरा

राजुरा शहरात किंवा शहरालगतच्या जंगल परिसरात कचरा टाकताना आढळल्यास दोषींवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल तसेच या ठिकाणी जनजागृती करिता व कचरा टाकू नये याकरिता तात्काळ ठीकठिकाणी फलक लावून माहिती देण्यात येणार. केटर्स, व्यापारी , चिकन सेंटर, सलून व्यावसायिक तसेच नागरिकांनी सहकार्य करून कचरा इतरत्र उघड्यावर न टाकता नगर परिषद स्वच्छता विभागास कळवावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉ. सुरज जाधव यांनी केले आहे.
डॉ. सुरज जाधव
मुख्याधिकारी तथा प्रशासन, नगर परिषद राजुरा

नागरिकांना जसे आपले अधिकार व हक्क अवगत आहेत त्याचप्रमाणे आपल्या कर्तव्यांचा सुद्धा सर्वांनी विचार करावा. अस्वच्छता दिसल्यावर इतरांना दोष देत बसण्यापेक्षा तो परिसर स्वच्छ करण्याकरिता स्वतः पुढाकार घ्यावा. मुळात अशी अस्वच्छता, घाण किंवा प्लास्टिकचा कचरा, शिळे अन्न बाहेर टाकू नये, कचरा करू नये याकरिता नागरिकांनी स्वतः जागृत असणे आणी इतरांना जागृत करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी केले आहे.
बादल बेले
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment