Ads

. राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त नेफडो तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप..

राजुरा 26 जून :ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, रजनी शर्मा, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा, नेफडो, कविता शर्मा, राजुरा तालुका संघटिका, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या स्मिता धोटे, पर्यवेक्षिका, मंगला गोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. घुमे, चिडे सर, उरकुडे मॅडम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.. Distribution of educational material by NEFDO on the occasion of Rajshree Shahu Maharaj Jayanti.
छ. राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त रजनी शर्मा यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने हा उपक्रम राबाविण्यात आला. यावेळी प्रा. घुमे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले तर रजनी शर्मा यांनी नेफडो संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमा सोबतच पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य करीत विविध जयंत्या पुण्यतिथी या सामाजिक उपक्रमा द्वारे राबविण्यात या संस्थेचा कायमच पुढाकार असतो असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक पाटील यांनी विध्यार्थी जीवनात थोर समाज सुधारकांचा आदर्श अंगीकारून आपण आपले आयुष्य जगले पाहिजेत असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला चींतलवार सर, परचाके सर, नरेश नुगुरवार, सर, मडावी सर, निमकर सर, प्रवीण वैरागडे सर , जूनघरे सर, पेंदोर सर, कांबळे सर, काळे सर, निखाडे सर, साळवे मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदिसह विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेफडो चे राजुरा तालुका संघटक मोहनदास मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक रजनी शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन कविता शर्मा यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment