Ads

वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे

वणी/ चंद्रपुर : वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड गावा नजीक येथील पर्यावरण आनी भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांना ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉरgiant dinosaurs of the late cretaceous प्राण्यांचे जीवाष्म सापडले आहे.दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते.यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांपासून छंद आणि अभ्यास म्हणून सर्वेक्षण करीत आहेत.Fossils of giant dinosaur found near Wani
ह्यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव,झरी तालुक्यात 6 कोटि वर्षाच्या शंख-शिपल्याची जिवाष्मे तर 150 कोटी वर्षं पूर्वीची स्ट्रोमॅटोलाईट ची जिवाष्मे शोधून काढली आहेत.त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 25 हजार वर्ष पूर्वीची पाषाणयुगीण अवजारे सुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी प्रदर्शित करून ठेवली आहेत.
वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक ह्या 150 कोटी वर्षे दरम्यानच्या काळातील पैनगंगा गृप चा चुनखडक असून त्या काळात इथे समुद्र होता.जुरासिक काळात इथे विशालकाय अश्या डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला.परंतु 6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले.इथे बेसाल्ट ह्या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही ते पाहायला मिळतात .परंतु अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.
विरकुंड गावाजवळ 50 वर्शापूर्वी डायनोसॉरचा अष्मीभूत सांगाडा असावा परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे आणि पहार बांधण्यासाठी वापरला,हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनोसॉरची हाडे सुद्धा घरे बांधन्यासाठी वापरली.त्यामुळे येथे पुन्हा जिवाष्मे आढळली नाही.40 वर्षापूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे ह्यांना एक जिवाष्मीकृत हाड सापडले. जीवाश्मांच्या आकार,प्रकारा वरून ,स्थळावरून ,काळावरून आणि भूशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या मतानुसार हे जीवाष्म डायनोसॉर चेच आहे असा विश्वास चोपणे ह्यानी व्यक्त केला. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खुप जिवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.
चंद्रपुर प्रमाणे वणी,मारेगाव, पांढरकवडा,झरी,मुकुडबन हा परिसर जिवाश्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृध्द आहे.ह्या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनोसॉर ची जिवाष्मे आढळू शकतात,त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्वे आणि संशोधन होणे गरजेचे आहे असे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यानी व्यक्त केले आहे.

प्रा सुरेश चोपणे(वणी) चंद्रपुर.
9822364473
sureshchopane@gmail.com

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment