सुशी दाबगावं दुर्वास घोंगडे ;
केळझर उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुशी वन बीटात चैलिन फेनशिंग चे काम चालू असून सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे संबंधित अभियंता व वन अधिकारी वर्गाकडून कामावर दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटदाराचे चांगलेच फावत असून गाव वाशियात कार्याप्रती तीव्र रोष निर्माण होत आहे. Misconduct in work of Sushi Dabgaon Chaining Fencing
चीचपली वनपरिक्षेत्रातील केलझर उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बीटात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कतल झाली असून एकेकाळी भरगच्च असलेले जंगल आता जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे वनातील वृक्षांची गरज लक्षात घेता ग्लोबल वॉर्मिग च्यां हेतूने शासन स्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात असून शासनाचं 33 कोटी वृक्ष लागवड योजना कार्यान्वित आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुशी दाबगावं गावां शेजारी असलेले अतिक्रमित घरे काढून त्याजागी नवीन वृक्षाची लागवड करण्याचे काम मंजूर करण्यात आले असून एका भाजपा प्रणित मुल येथील एका कंत्राट दारास वृक्षा रोपण सौरक्षान करिता चेनलिंग फेंगसिन के कंत्राट दिल्याचे समजते. वृक्ष संगोपन व संवर्धन करण्याच्या हेतूने सद्या काम युद्ध पातळीवर सुरू असून एकीकडे वृक्ष लागवडीकरीता गड्डे खोदकाम चालू आहे, तर दुसरी कडे सदर वृक्षाला सौरक्षन वावे म्हणून चैनिंग फेंगशिंग चे काम चालू आहे. मात्र सदर कामात निकृष्ट साहित्य वापरल्या जात असून कामात मोठा गैरव्यवहार होत आहे.
काम जलद करण्याच्या नादात कंत्राटदार यांचे कडून अभियंता व वन विभागाचा वरिष्ठ अधिकारी यांना विश्वासात घेऊन चेनलिंग फेंसींग चे काम निकृष्ट दर्जाचे करीत आहे. चेनलींग फेंशींग जाळी करिता लावण्यात येत असलेले पोल कमी दर्जाचे व नियम बाह्य आहेत शिवाय पोलचे खडे कमी खोदण्यात आले असून त्यात टाकण्यात येणारा मटेरियल सुद्धा निकृष्ट आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने काँक्रेटला पाणी आवश्यक असताना कंत्राट दारकडून मोठ्या मुश्किलिने एकदाच काही पाणी मारल्या जात आहे. एकंदरीत सदर कामाचं दर्जा हिन असून काम अंदाज पत्रकाला डावलून चालू आहे. त्यामुळे अल्पावधीतच पोल तुटून पडण्याची व जाळी सुद्धा तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे वन विभागाची वृक्ष लागवड योजना यशस्वीेतेकरिता वृक्षांचे संवर्धन व संगोपन होणार का ? की ही योजना केवळ अधिकारी व कंत्राट दाराला अर्थार्जन मिळवून देणारी होणार असा प्रश्न नागरिकांत निर्माण होत आहे.
कंत्राट दाराला अंदाज पत्रकानुसर काम काम करणे आणि सदर काम सबंधित अभियंता व वन अधिकारी यांचे कडून करवून घेणे हे आवश्यक असताना याकडे सबंधित विभागाचे तूर्तास दुर्लक्ष होत असल्याने सबंधित यंत्रणेवर नागरिकांत मोठा रोष निर्माण होत आहे. तर कंत्राटदार हे भाजपा प्रणित कंत्राट दार असल्याने वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी घेऊन काम करीत असल्याने क्षेत्रातील अधिकाऱ्यांना प्रकार लक्षात येत असताना सुद्धा कार्यवाही करू शकत नसल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे नेमकी तक्रार कार्याची कुन्हाकडे असा मोठा प्रश्न सुशी दाबगावं येथील नागरिकां पडला आहे.
0 comments:
Post a Comment