Ads

भद्रावती येथे राज्यस्तरीय चांदा कराटे कप-2023 चे 18 मे ला आयोजन

भद्रावती तालुका प्रतिनिधी : आत्मसंरक्षणाचा खेळ म्हणून संपूर्ण जगात लोकप्रिय असलेला कराटे हा खेळ आजच्या काळात आत्मसंरक्षणासाठी गरजेचा आहे. विशेष करून मुलींना अचानक येणाऱ्या संकटाचा सामना करण्याकरिता तो शिकणे गरजेचे आहे. हा उद्देश समोर ठेवून दिनांक 18 जून 2023 रोज रविवारला चांदा कराटे कप- 2023 या नावाने कराटे स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती सेन्साई प्रा. दुष्यंत नगराळे यांनी पत्र परिषदेत दिली.State Level Chanda Karate Cup-2023 organized at Bhadravati on 18th May
स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात अमेचर स्पोर्टस असोशिएशन चंद्रपूर डिस्ट्रिक, एलन थिलक शितो ऱ्यु कराटे स्कूल इंटरनॅशनल चंद्रपूर जिल्हा शाखा तसेच नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने "चांदा कराटे कप - 2023" या नावाने महाराष्ट्र राज्य ओपन कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या स्पर्धेत राज्यातून जवळपास 400 खेळाडू सहभागी होतील. त्यात प्रत्येक राऊंड मध्ये प्रथम येणाऱ्या खेळाडूस शिल्ड आणि मेडल देण्यात येईल. ही स्पर्धा ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिप आणि ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या दोन गटात असून त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या महिला आणि पुरुष अशा 12 खेळाडूंना संयुक्तरित्या 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी शेवटी केले. पत्रपरिषदेत सिहांन मनीष सारडा,रेंशी दुर्गराज रामटेके, अतुल कोल्हे, सुरेश जयस्वाल, संजय माटे, किशोर झाडे, सुनील गायकवाड, गौतम भगत, बंडू रामटेके आणि विजय सपकाळ उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment