वरोरा (प्रती): वरोरा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागील विधानसभेचे उमेदवार रमेश राजूरकर हे रविवार दिनांक 25 जून रोजी भद्रावती येथील जैन मंदिराच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर पूर्व विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत .त्याचप्रमाणे नव्या युवा नेतृत्वाची सुद्धा भाजपा मध्ये इनकमिंग सुरु झाली आहे.New hopes..... new faces... new leadership will enter BJP
वरोरा येथील युवा तडफदार नेतृत्व असलेले शुभम चांभारे सह असंख्य कार्येकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि.25 जून रोजी आनंदवन चौक येथे जाहीर सत्कार दरम्यान प्रवेश करणार आहेत. तसेच रमेश राजूरकर, ओबीसी नेते डॉ अशोक जिवतोडे यांचा भाजपा मध्ये प्रवेश होत असल्याचे समजताच राजकीय विरोधकांनी याचा धसका घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जाते.
दिग्गज नेत्यासह नव्या उमेदीचे नव्या चेहऱ्याचे आणि युवा सामाजिक कार्येकर्ते शुभम चांभारेसह असंख्य कार्येकर्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
कोण आहेत शुभम चांभारे
वरोरा येथील रहिवाशी शुभम चांभारे हे एक व्यावसायिक आहेत, सामाजिक क्षेत्रात नाव लौकिक असणारे राजकारणातल्या पडद्यामागील ते राजकीय अभ्यासक आहेत. उच्चशिक्षित असलेले शुभम चांभारे यांनी आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षात प्रवेश केला नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन शुभम चांभारे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे
0 comments:
Post a Comment