Ads

वरोरा पोलिसांनी युवका कडुन 10 किलो गांजा केला जप्त

वरोरा जावेद शेख :-पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. १४/०७/२३ रोजी गोपनीय माहीतीगार याचेकडुन माहीती मिळाली की, एक इसम हा आपले निळया रंगाच्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुन जात आहे.
Warora police seized 10 kg of Marijuana from the youth
या माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप, पोलीस स्टेशन माजरी येथील पोलीस स्टॉप, स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर येथील पोलीस पथक यांनी सापळा रचुन आरोपी नामे रमेश शंकर नरवडे वय ४१ वर्ष रा. बगळ खिडकी नाग मंदीर जवळ चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात असलेल्या निळया रंगाचा ट्रॅव्हलींग बॅगची झडती घेतली असता त्यात खाकी रंगाचे प्लास्टीक टेप पट्टीमध्ये गुंडाळलेल एकुन ०५ नग बंडल ज्यात एकुन १०.२६४ किलो ग्रॅम गांजा कि. १,०२,६४० रू. चा अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदरचा गांजा जप्त करून आरोपी विरूध्द एन. डी. पि.एस. कायदा कलम ८(क), २०(ब),II(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपासात आहे. सदर आरोपीचे पोलीस कोठडी रिमांड घेवुन पुढील आरोपीतांचा शोध घेणे सुरू आहे.

सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. सहा पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात परि. पो. उप अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी योगेश रांजणकर पो. स्टे. वरोरा, सपोनि निलेश चवरे, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि किशोर मित्तरवार, नापोशि किशोर बोढे, पोअं. दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम, फुलचंद लोधी तसेच पो.स्टे. माजरी येथील सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि भोजराम लांजेवार, नापोशि अनील बैठा व स्थागुशा येथील पोनि महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे यांचे पथकांनी पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment